महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १ मे निमित्त झेंडावंदन व शिवबंधनाचा कार्यक्रम संपन्न.

*लोकदर्शन 👉 मोहन भारती


*सोलापूर दिनांक :- ०२/०५/२०२२ :-* शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने १ मे हा जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडावंदन आणि विडी कामगारांना शिवबंधन कार्यक्रम करण्यात आला आहे.
१ मे या जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार सेना कार्यालय येथे सकाळी १० वाजता महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकविण्यात आला. यावेळी कामगार बंधु – भगिनींनी महाराष्ट्र दिनाचा विजयी असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, कामगार दिन चिरायू हो – हो, जय भवानी – जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यानंतर कामगार बंधू – भगिनींना मिठाई वाटप करण्यात आले. त्यानंतर ११ वाजता माँ साहेब घरकुल वसाहत दक्षिण सोलापूर कुंभारी येथे हिंदुह्दयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या मुर्तीचे पुजन करून घरकुल वसाहतीतील सुमारे १२८० महिला कामगारांना शिवबंधन बांधण्यात आले.
यावेळी स्व. बाळासाहेब व स्व. मिनाताई ठाकरे यांच्या जयघोष व अमर रहे या घोषणा दिल्या यावेळी संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनाचे महत्व सांगितले.
सदर कार्यक्रमास विष्णु कारमुपरी (महाराज), विठ्ठल कुऱ्हाडकर, पप्पु शेख, नरेश अन्नलदास, प्रशांत जक्का, नागेश गाडपल्ली, संतोष गद्दे यांच्यासह विडी कामगार बंधु – भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *फोटो मॅटर :- १ मे या जागतिक कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा वंदन व शिवबंधन करतांना विष्णु कारमपुरी (महाराज), दशरथ नंदाल, विठ्ठल कुऱ्हाडकर व कामगार बंधु – भगिनी दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *