मुख्याध्यापक धनराज मालेकर व मेडिकल स्टोअर चे संचालक शेखर ढवस यांना अज्ञात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने चिरडले.                                                   

  लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर-कोरपना राष्ट्रीय महामार्ग वरील घटना
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
स्थानिक महात्मा गांधी विद्या मंदिर गडचांदूर चे मुख्याध्यापक धनराज नत्थु मालेकर(34) व त्यांचा मित्र मेडिकल स्टोअर चे संचालक शेखर उद्धव ढवस(33)हेजिवलग मित्र दररोजच्या प्रमाणे गुरुवारी पहाटे 5 च्या दरम्यान खिर्डी येथून राष्ट्रीय महामार्ग वर फिरायला गेले असताना खिर्डी-धामणगाव दरम्यान इंजापूर फाट्यावर अज्ञात भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रक ने दोघांनाही चिरडले, दोघेही घटनास्थळी ठार झाले, अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी नातेवाईक, गावकरी दाखल झाले,संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी 3 तास महामार्ग रोखून धरला,दोन्ही मार्गाने वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या,गडचांदूर पोलिसांनी जमावाला शांत केले,पंचनामा केल्या नंतर दोघांचेही मृतदेह गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करीता आणण्यात आले,पोलीस फरार झालेल्या ट्रक चा शोध घेत आहेत,पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे करीत आहेत.
शवविच्छेदन झाल्यानंतर दोघावर खिर्डी येथे अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले,
खिर्डी येथील 2 तरुण युवकांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
,,,,,,,,,,
महात्मा गांधी विद्यालयात वाहिली श्रद्धांजली
महात्मा गांधी विद्या मंदिर चे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक धनराज मालेकर यांना स्थानिक महात्मा गांधी विद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, विद्या मंदिर, स्कॉलर अकॅडमी च्या वतीने सकाळी प्राचार्या स्मिता चिताडे यांच्या अध्यक्षतेखाली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली,याप्रसंगी विद्यार्थी,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
,,,,,,,,,,,,,,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *