. रघुराज मेटकरी साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित ! विलास खरात तर्फे अभिनंदन

.

लोकदर्शनविटा ;👉राहुल खरात

प्रतिकूल परिस्थितीत साहित्यक्षेत्राची आवड जोपासली. दूर दृष्टीतून साहित्य निर्मिती केली. साहीत्य सेवा मंडळाच्या माध्यमातून विविध साहित्यीक अपक्रमांचे आयोजन केले. मुक्तांगण वाचनालय उभे करून वाचन चळवळ वाढविली. विटेकरांना समाजाला साहित्यरूची निर्माण व्हावी यासाठी सतत धडपड सुरू ठेवली. अनेक सहकाऱ्यांना बरोबर घेवून गेल्या ४५ वर्षात ४१ साहित्य संमेलनाचे नेटके संयोजन केले. दिग्गज व नामवंत साहित्यीक, कवी, वक्त्यांची मंदियाळी विटे नगरीत अवतरली ती तुमच्या अथक परिश्रमामुळेच!

काव्य व्यक्तीचरित्र, कथासंग्रह, कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकरणातील आपली पुस्तके प्रकाशीत आहेत. हे आपल्या साहित्य अभिरुचीचे व विपूल लेखनाचे प्रतिक आहे. आपले संपूर्ण कुटुंब साहित्य सेवेत रमते, हा आपल्या साहित्यावरच्या निस्सिम प्रेमाचा भाग मानावा लागेल. तमाम विटेकर व विविध गावातील असंख्यांना कवि, साहित्यीक, साहित्य ससिक बनविण्यासाठी आपले महत्वपुर्ण योगदान आहे. शिक्षण क्षेत्रातही आपले कार्य उंच आहे.

विविध क्षेत्रात खास करून साहित्य क्षेत्रात अनेक पुरस्कार मिळवले आहेत. साहित्य जगणाऱ्या आणि साहित्य उन्नतीसाठी तन-मन-धन अर्पण करणाऱ्या विटे नगरीला संमेलनाचं गांव अशीही ओळख1 निर्माण करून देणाऱ्या साहित्य साधकास. पुरस्काराने गौरविण्यात आले त्याबद्दल सरांचे

अभिनंदन, धन्यवाद मानतो कळावे आयु विलास खरात सचिव साहित्य रत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान आटपाडी जिल्हा सांगली मो नंबर ९२८४०७३२७७

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *