चंद्रपूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना मिळणार राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर


*⭕आ सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकर*

*⭕केंद्रीय सामजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांची नवी दिल्लीत घेतली भेट*

 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पक नेतृत्वात प्रारंभ झालेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरीब आणि वंचित ज्येष्ठ नागरिकांना मिळणार असून येत्या जून महिन्यात यासाठी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला असून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री श्री. रामदास आठवले यांची श्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत रामदास आठवले यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी या योजनेच्या माध्यमातून आवश्यक विविध उपकरणे उपलब्ध करून देण्यात येतील असे आश्वासन दिले.
राष्ट्रीय वयोश्री योजनेची सुरुवात मा. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या संकल्पनेतून सन 2017 मध्ये झाली. या योजनेतून देशातील ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळात आनंददायी आणि सुखकर जीवन व्यथित करता यावे यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून सहायक उपकरणे मोफत उपलब्ध करून दिली जातात. ज्यामध्ये कर्ण यंत्र, बैसाखी, दीव्यांग नागरिकांना कृत्रिम अवयव यासारखी उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.

श्री रामदास आठवले यांच्याशी झालेल्या चर्चेत श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूर आणि गडचिरोली हे आदिवासीबहुल जिल्हे असून, अत्यंत मेहनती, कष्टकरी लोक या जिल्ह्यात वास्तव्य करतात. या नागरीकांना उत्तम आरोग्य सेवा देणे यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून विविध आरोग्य विषयक उपक्रम सुरु असतात; परंतु राष्ट्रीय वयोश्री योजनेच्या माध्यमातून अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन कंठत असलेल्या समाजातल्या शेवटच्या घटकाला खूप मोठा आधार मिळेल आणि जीवन जगण्याची नवी उमेद जागृत होईल. श्री रामदास आठवले यांनी श्री मुनगंटीवार यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देऊन तातडीने सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
प्रारंभी जिल्ह्यात ठिकठिकाणी तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार असून, त्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात येतील. तज्ज्ञ डॉक्टांकडून या रुग्णांची तपासणी केली जाणार आहे.
या बैठकीला गडचिरोली चे खासदार श्री अशोक नेते हेदेखील उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *