शेतकऱ्याने केला कालवडीचा नामकरण सोहळा.

.          लोकदर्शन 👉 मोहन भारती

-पशुप्रेमाचा परिचय-गौरीला मिळाली वेगळी ओळख.
-वरोरा तालुक्यात -गौरीच्या नामकरणाची सर्वत्र चर्चा.
*वरोरा*:-मथळा वाचून आश्चर्य वाटेल हो पण हे अगदी सत्य आहे.केम येथील गंगाधर दातारकर यांच्या घरी नुकत्याच जन्मलेल्या गावठी गाईच्या वासराचा नामकरण सोहळा पार पडला.
नामकरण सोहळ्याचे अध्यक्ष राजू चिकटे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा,उदघाटन शुभंगीताई दातारकर सरपंच सुमठाना,डॉ नंदकिशोर मैंद ळकर पशु वैद्यकीय अधिकारी वरोरा,दुर्गाताई महाकाळकर पोलीस पाटील,लीलाधर दडमल अध्यक्ष तंटामुक्त समिती,श्रीरंग बरडे, वरभे सर,डाखरे सर,ढगे सर,आदी उपस्थित होते.
या नामकरण सोहळ्याची व गौरी या कलवाडीची सोशल मीडिया सह पंचक्रोशीत चर्चेला उधाण आले आहे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर त्याची अन्नदात्री गाय आहे माझ्या लेकराप्रमाणे प्रमाणे मी या प्राण्यावर प्रेम करतो त्यांना माझ्या घरातील सभासद समझतो असा गोमतेप्रति असलेला कृतज्ञतेचा भाव त्यांनी व्यक्त केला.भूतदया ही संकल्पनाच मानवाला इतर प्राण्यापासून वेगळे करते प्राणी मात्रावर दया करा त्यांना प्रेम द्या हा संदेश देणाऱ्या कितीतरी प्राणीमित्र संघटना आज देशभरात कार्यरत आहेत.मात्र पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेल्या कलवाडीला वेगळी ओळख देण्याचे त्यांनी ठरविले,बाळाचे नामकरण सर्वत्र करतात त्यांनी मात्र आपल्या कालवाडीचे(गौरी)नामकरण सोहळा साजरा करून पशु प्रेमाचा परिचय दिला.त्यांच्याकडे 2 गाई 2 बैल आहेत घरची हलाखीची परिस्थिती असूनही ते पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळतात त्यांच्या देखभालीत काहीही कमी पडू देत नाही.एकवेळ स्वतः उपाशी राहतील मात्र गायी-वासरांची नीट सोय करतात पशुधनानाही त्याचा विशेष लळा आहे मालक दिसले की सर्व जनावरे सभोवताल गोळा होऊन हंभरतात चारा टाकून खा म्हटले की खाण्यास सुरवात करतात वासराच्या नामकरणाची कल्पना यांनी गंगाधरला दिली व त्याला प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळ,महिला भजन मंडळाच्या साथीने गावात स्वच्छता मोहीम राबविली परिसर रांगोळी फुलांनी सजविले लक्ष्मीची आरती,गौळण, पाळणा गाऊन भजन मंडळींनी आनंद द्विगुणित केला गावात उत्साह,आनंद संचारले होते अशा आनंदी वातावरणात कालवाडीचे गौरी असे नामकरण करण्यात आले त्यानंतर अल्पोहर व मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.पशुपालकांनी याचा आदर्श ठेवावा पशुधन विकण्यापेक्षा त्याची जोपासना करणे आवश्यक आहे समाजात बरेच सोहळे होतात मात्र मुक्या पशुसाठी आयोजित केलेल्या सोहळा आत्मिक समाधान देऊन गेला सरपंच शुभांगी सातारकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता अरुण राऊत,अविनाश ढोके, तुकाराम पावडे,शंकर रहाटे, कल्पना राऊत,स्वाती ढोके, बेबी राऊत,विठ्ठल राऊत,विवेक ढोके, गजानन राऊत,नयन दातरकर,नामदेव रहाटे, हनुमान आडे यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *