व्यवसाय अभ्यासक्रम च्या 12 वी च्या विद्यार्थ्यांकडून महाविद्यालयाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा भेट। !                                                         

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील एम,सी,व्ही, सी, चे 12 वी चे विद्यार्थी उद्देश गोडशेलवार व आकाश आत्राम यांनी महाविद्यालयाला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा 8 एप्रिल ला भेट दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे होते,प्रमुख अतिथी म्हणून उपप्राचार्य विजय आकनूरवार,एम,सी, व्ही, सी, विभागाचे प्रमुख प्रा, अशोक डोईफोडे, प्रा, बी,एस, पत्तीवार,प्रा, माधुरी पेटकर, प्रा, रोशन मेश्राम होते ,याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी 12 वी च्या विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या,
कार्यक्रम चे संचालन प्रा, माधुरी पेटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा, रोशन मेश्राम यांनी केले. याप्रसंगी सिद्धेश्वर पुष्पलवार, तथा इतर विद्यार्थी उपस्थित होते.
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *