गोपाल नगरात विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू

!! लोकदर्शन 👉 मोहन भारती

*⭕!!नगरसेवक अरविंद डोहे सह नगरवासी यांचे उपकार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन*!!

*गडचांदूर* – *गडचांदूर येथील प्रभाग क्र पाच गोपाल नगरात विद्यु*तचा दाब फार कमी असून त्याभागातील कुलर पंखे चालत नाही. रात्रोला सुद्धा पंखे कुलर चालत नसल्याने डासांचा प्रमाण मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. व तब्बेतीत बिघाड होत असून घरगुती बोरवेल चालत नसल्याने पाण्याची टंचाई सुद्धा भासत आहे.यामुळे तेथील नागरिक या विधुत कमी दाबा मुळे अक्षरशा हैराण झाले असल्याने तेथील नागरिकांनी नगरसेवक अरविंद डोहे सह इतर नागरिकांनी आज मा.उपकार्यकारी अभियंता श्री इंदूरकर साहेब व मा. सहाययक अभियंता श्री राऊत साहेबाना भेटून निवेदन दिले. व गोपाल नगरातील विद्युत दाब वाढवा अन्यथा आंदोलन करू अश्या आशयाचे निवेदन दिले.असता त्यांनी तात्पुरती काही व्यवस्था करू व येत्या दोन महिन्यात नवीन विद्युत डीपी लावण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी नगरसेवक अरविंद डोहे,अरविंद कोरे,रमाकांत काळे,दीपक गुरनुले,बबलू रासेकर,राजू माणुसमारे,आदी गोपाल नगरातील नागरिक उपस्थित होते.आता विद्युत मंडळ काय करतीय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे*.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *