Home
Home Breaking News अखेर ,,,तो सिमेंट रोड वाहतुकीसाठी खुला,,,.     

अखेर ,,,तो सिमेंट रोड वाहतुकीसाठी खुला,,,.     

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,
⭕दुसऱ्या बाजूच्या सिमेंट रोड चे काम तातडीने सुरु करा,,,,,मागणी
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,
औद्योगिक शहर गडचांदूर येथील राजीव गांधी चौक ते माणिकगड सिमेंट कंपनी प्रवेशद्वार पावेतो च्या एका बाजूच्या सिमेंट रोड चे काम पूर्ण झाले आहेत व आता त्या रोड वरून वाहतूक सुद्धा सुरु झाली आहेत, मात्र लगतच्या दुसऱ्या बाजूने सिमेंट रोड चे बांधकाम तातडीने करणे गरजेचे आहे, तेव्हा संबंधित ठेकेदाराने या सिमेंट रोड चे काम त्वरित सुरु करुन पूर्ण करून वाहतुकीसाठी सुरु करावा अशी नागरिकांची मागणी आहे, गेल्या काही वर्षांपासून या मार्गाचे काम अतिशय संथपणे सुरू आहेत, दरम्यान खुद्द विद्यमान आमदार सुभाष धोटे ,यांनी उपोषण चा इशारा देताच काम सुरू केले, मात्र एकाच बाजूचे काम केले, आता दुसऱ्या बाजूने सुध्दा त्वरित सिमेंट रोड करावा अशी मागणी आहे. या मार्गावर दिवस रात्र वाहतूक सुरु असते, सिमेंट कंपनीची जड वाहतूक करणारे ट्रक याच मार्गाने जात आहेत, एकेरी वाहतुकीमुळे बरेचदा वाहतूक कोंडी सुद्धा होते,लोकप्रतिनिधी नी याकडे लक्ष वेधून या रोड चे काम तातडीने पूर्ण करून वाहतूकी करिता खुला करून दिलासा द्यावा अशी मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here