श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचे मुर्ती प्रतिष्ठापनेने पुण्यतिथी उत्सवास प्रारंभ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती


*सोलापूर दिनांक :- ०२/०४/२०२२ :-* श्री दिगंबर मुनिनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या श्री दिगंबर महाराज पुण्यतिथी महोत्सवास महाराजाच्या मुर्ती प्रतिष्ठापनेने प्रारंभ करण्यात आला.
प्रति वर्षीप्रमाणे श्री दिगंबर मुनिनाथ महाराजांचे ४६ व्या पुण्यतिथी महोत्सव दि. ०२/०४/२०२२ ते दि. ०९/०४/२०२२ पर्यंत साजरा करण्यात येत आहे. आज गुढीपाडवा सप्ताहाचा पहिला दिवस पाहटे ५ ते ६ काकड आरती, सकाळी ६ ते ७ हरि किर्तन आणि सकाळी ८ ते ९ ज्ञानेश्वर प्रारायण करण्यात आली. त्यानंतर सकाळी १० वाजता श्री दिगंबर मुनिनाथ महाराज व सुशिलम्मा मातेचे प्रतिष्ठापना मंडळाचे संस्थापक विष्णु कारमपुरी (महाराज) यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर महापुजा व महाआरती पुजन करण्यात आली. महाराजांचे मुर्ती प्रतिष्ठापनेने आज २ एप्रिल पासून ९ एप्रिल पर्यंत पुण्यतिथी महोत्सव विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम साजरी करण्यात येणार आहे.
सदर प्रसंगी श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, श्रीनिवास कुसुरकर, राजव्वा चिलवेरी, विष्णु चिलका, कवसल्या मुरकुल, दशरथ नंदाल, सिद्राम पोला, सुनंदा कुसुरकर, कलावती कुसूरकर, अक्षय नंदाल, अनसुया कारमपुरी, ॲड मुनिनाथ कारमपुरी, सुदर्शन बोड्डू, श्रीकांत कुसूरकर, नागार्जुन कुसुरकर, गणेश म्हंता, गुरूनाथ कोळी, प्रशांत जक्का व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================
*फोटो मॅटर :- श्री दिगंबर मुनिनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवास मुर्ती प्रतिष्ठापना करताना विष्णु कारमपुरी (महाराज), श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, श्रीनिवास कुसुरकर व भाविक बंधु – भगिनी दिसत आहेत.*

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *