गडचांदुरात आमदार चषकाचे थाटात उद्घाटन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕राष्ट्रीय स्तरावरील व्हॉलीबॉल संघांचा समावेश

गडचांदूर – आमदार सुभाष धोटे यांच्या पुढाकारातून दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लब गडचांदूर व भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्था गडचांदूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचांदूर येथे राष्ट्रीय स्तरावरील वालीबाल सामन्यांचे आमदार चषक आयोजित करण्यात आले असून नुकताच उद्घाटन सोहळा पार पडला.
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते आमदार चषक – २०२२ चे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेत महिला व पुरुष असे दोन गट करण्यात आले असून महिला गटात देशातील पुणे, जबलपुर, आग्रा, पंजाब, गुजरात, चंद्रपूर, यवतमाळ, हैदराबाद, दिल्ली येथील संघांनी सहभाग घेतला आहे. तर पुरुष गटात देशातील कामठी, पंजाब, यवतमाळ, नागपूर, विजयवाडा, विशाखापट्टनम, महाराष्ट्र स्पायकर, हैदराबाद येथील संघांनी सहभाग घेतला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजुरा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अरुण धोटे उपस्थित होते तर स्वागताध्यक्ष म्हणून गडचांदूर येथील नगराध्यक्ष सविता टेकाम उपस्थित होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून कोरपना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विठ्ठल थिपे, शुभांगी धोटे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष शरद जोगी, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष हंसराज चौधरी, गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक राहुल उमरे, नगरसेविका अर्चना वांढरे, महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता चिताडे, माजी उपनगराध्यक्ष सचिन भोयर, सामाजिक कार्यकर्ते मनोज भोजेकर, डॉ. कुलभूषण मोरे विजय डाहूले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष उमेश राजूरकर, माजी सरपंच शिवकुमार राठी, माजी सरपंच बाबाराव पुरके, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष महाडोळे, रोहित शिंगाडे, अल्पसंख्यांक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख अहमदभाई, पंडित काळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
आमदार सुभाष धोटे यांनी यावेळी बोलताना म्हटले की, गडचांदूरसारख्या शहरात पहिल्यांदाच आमदार चषक आयोजित करण्यात आले असून यामुळे शहराचे नावलौकिक झाले आहे. वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या व्हॉलीबॉल संघाचे त्यांनी यावेळी स्वागत व कौतुक केले.
कार्यक्रमाचे संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले तर प्रास्ताविक दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे सचिव विक्की मुन यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दृढ संकल्प स्पोर्टिंग क्लबचे अध्यक्ष विनोद तराळे, भिमसेना बहुउद्देशीय सुधार संस्थेचे अध्यक्ष राहुल उमरे यांच्यासह सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *