पर्यटन केंद्र असलेल्या अमलनाला धरणातील गाळ काढून खोलीकरण करा,, ,,ईबादुल सिद्दीकी यांची मागणी,,

लोकदर्शन 👉 मोहन भारती

,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,
गडचांदूर च्या जवळपास असलेल्या अमलनाला धरणातून गाळ काढून खोलीकरण करावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्धीकी यांनी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्या कडे केली आहे,
1985 मध्ये तयार करण्यात आलेल्या अमलनाला धरणामुळे औद्योगिक विकास झाला तसेच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात असल्याने अमलनाला धरणाला महत्त्व आले आहेत व आता पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहेत, आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने करोडो रुपये ची विकास कामे सुरू आहे,
धरणाच्या निर्मिती पासून आजपावेतो धरणातून गाळ काढला नाही, तेव्हा गाळ काढणे आवश्यक आहे, गाळ काढून खोलीकरण केल्यास पाणीसाठा वाढेल, तेव्हा पाटबंधारे विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन धरणांमधून गाळ काढून खोलीकरण करावे व निघालेला गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ईबादुल सिद्दीकी यांनी संबंधित विभागाचे अधिकारी व मंत्री महोदयांकडे तसेच लोकप्रतिनिधी कडे केली आहे.
2018 मध्ये अमलनाला धरणाला पर्यटन केंद्र चा दर्जा मिळाला आहे, पर्यटन विकास साठी 7 करोड रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, व टप्प्या टप्प्याने विकास कामे पूर्ण केली जात आहेत.
आता उन्हाळ्यात या धरणाचे खोलीकरण केले तर येणाऱ्या पावसाळ्यात धरणातील पाणीसाठा वाढेल यात शंकाच नाही. सध्या या धरणातून 8417 हेक्टर कृषी क्षेत्र ओलित होत आहेत, खोलीकरण केल्यास कृषी क्षेत्रात सुद्धा वाढ होईल.
पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष न करता तातडीने उन्हाळ्यात अमलनाला धरणांमधून गाळ काढून खोलीकरण करावे अशी मागणी केली जात आहेत.
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *