कोरपना येथे काँग्रेस डिजिटल सदस्य नोंदणी आढावा बैठक संपन्न.                                                               

लोकदर्शन 👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर,,,,
राजुरा विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार सुभाष भाऊ धोटे यांचे निर्देशानुसार कोरपना येथे काँग्रेस पक्षाच्या डिजिटल सदस्य नोंदणी करिता नियुक्त मुख्य नोंदणी कर्त्यांची आढावा बैठक तालुका काँग्रेस कॅमेटी चे अध्यक्ष मा. विठ्ठलराव थिपे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
तालुका सदस्य नोंदणी समन्वयक माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पेचे यांनी आपल्या प्रस्तावनेत सांगितले की काँग्रेस पक्षाने प्रथमच डिजिटल पद्धतीने सदस्य नोंदणी सुरू केली असून संपूर्ण पारदर्शक पद्धतीने नवीन नोंदणी केली जाणार आहे. सदस्य नोंदणी मोहिमेत मुख्य नोंदणी कर्त्यांनी आपल्या क्षेत्रातील नोंदणी करत्यांची निवड करून कोरपना तालुका हा जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य नोंदणी करणारा तालुका म्हणून समोर येईल यासाठी सर्वांनी संपूर्ण प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विजयराव बावणे यांनी जिल्ह्यातील सर्व नगर पंचायत क्षेत्रातून कोरपना नगर पंचायत मध्ये सर्वाधिक सदस्य केली जाईल या बाबत उपस्थितांना आश्वस्थ केले.
नगर परिषद गडचांदुर चे गटनेता विक्रम येरणे यांनी संपूर्ण सदस्य नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली.
कार्यक्रमाला पंचायत समितीचे उपसभापती संभाजी कोवे, ज्येष्ठ नेते सुरेश पाटील मालेकर, मनोहरराव चन्ने, गणेश गोडे, तालुका युवक काँग्रेस चे अध्यक्ष शैलेश लोखंडे, संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष उमेश राजूरकर, नगर पंचायत उपाध्यक्ष इस्माईल शेख, नगरसेवक नितीन बावणे, निसार शेख, रोशन आस्वले, आदिवासी योजना प्रकल्प सदस्य विलास मडावी, प्रशांत लोढे, सचिन मालेकर, स्वप्नील माणूसमारे, सुनील कोहचाडे, रोशन मरापे, अनिल गोंडे उपस्थित होते. संचालन गणेश गोडे तर आभार प्रदर्शन निसार शेख यांनी केले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *