ए आय एम आय एम पक्षाचा विस्तार ,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महिला शहर व तालुका कार्यकारणी गठित

लोकदर्शन 👉 मोहन भारती।

.
,,,गडचांदुर.—-
मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमिन अर्थात AIMIM या राजकीय पक्षाचा विस्तार चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यात व देशात दिवसेंदिवस वाढत असून गडचांदूर शहरात नुकतेच इतर राजकीय पक्षाला सोडून महीलाचा एक मोठा गट या पक्षात सामील झाल्याने इतर राजकीय पक्षाच्या भुवया उंचावल्या असून राजकीय पक्षात खळबळ उडाली आहे. कोरपना,राजुरा तालुक्यातील गडचांदुर्,नांदा फाटा, डेवाडा, येरगव्हान येथे पक्ष कार्यकारणी स्थापन झाली असून लवकरच जिवती, पिपरडा,कोरपना,पाटण,शेंनगावं,मरकागोदी,येथे पक्ष स्थापना होणार आहेत.कोरपना तालुका अध्यक्ष पदी सौ.शमा शब्बीर शाह,तर उपाध्यक्षपदी सौ.गीताबाई तेलतुंबडे तर गडचांदुर शहर अध्यक्ष अर्शिया पठाण,उपाध्यक्ष आशू इलियास पठाण,सचिव मुयरूम रहीम शेख, याची बिन विरोध निवड करण्यात आली तर गडचांदुर युवा आघाडी अध्यक्ष मैनु बेग,तर उपाध्यक्ष तोसिफ सादिक अली,सचिव युसुफ नइम शेख याची सर्वानुमते निवड तालुका अध्यक्ष मो.रफिक शेख यांनी केली असून सर्वांना नियुक्ती पत्र देण्यात आले .यासाठी पत्रकार नासीर खान,शेख कादर भाई शेख,शहर अध्यक्ष मुनाफ शेख,उपाध्यक्ष रऊफ शेख,सचिव सोहेल शेख ,संघटक शब्बीर शहा,कासिम अली,आदींनी अथक परिश्रम घेतले. पक्ष कार्यालयात पेढे वाटून पक्षाचा 64 वा वर्धापन साजरा करण्यात आला.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *