फुले एज्युकेशन तर्फे सत्यशोधक स्वप्नील गिरमे आणि शामल भिंगारे या उच्चशिक्षिताचा अंतर जातीय 32 वा.सत्यशोधक विवाह सोहळा सम्पन्न

लोकदर्शन 👉 राहुल खरात

*पुणे*- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रातर्फे गुरूवार दि.24 फेब्रुवारी 2022 रोजी सायं. 8.30 वा.उच्चशिक्षित सत्यशोधक ऍड.स्वप्नील मनोज गिरमे,माळी,फुरसुंगी आणि  सत्यशोधिका इंजिनिअर शामल शामकांत भिंगारे ,बौद्ध,कात्रज यांचा हॉटेल रॉयल इरिस,मांजरी  येथे संस्थेच्या वतीने 32 वा मोफत अंतर जातीय सत्यशोधक विवाह सोहळा कोव्हिडं 19 च्या नियमाप्रमाणे पार पडला.
यावेळी सत्यशोधक ढोक म्हणाले की मनोज गिरमे कुटुंबातील सर्वांनीच जाती संपुष्टात आणावेत यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. स्वतः आणि मुलगी मुलगा यांना उच्चशिक्षित करून दोन्ही परिवाराचे सम्मतीने त्यांनी सर्वांचे अंतर जातीय विवाह लावून जाती संपुष्टात आणून खऱ्या अर्थाने फुले शाहु आंबेडकर यांच्या कृतिशील विचाराचे पाईक बनले आहेत. ऍड स्वप्नील हे गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसाय देखील 60 टक्के समाजसेवा म्हणून करीत यापुढे आम्ही दोघेही निर्भय सत्यशोधक कार्याचा प्रसार करू असे जाहीर पणे बोलल्याने दोन्ही परिवाराचे जाहीर अभिनंदनही केले .पुढे ढोक म्हणाले की यापुढे सर्वांनीच या विज्ञानयुगात स्त्री पुरुष समानता व मांनवताधर्म पाळत सत्यशोधक पद्धतीने विवाह करणे व अंधश्रद्धा, कर्मकांड, महूर्त याला छेद देणे ही काळाची गरज असल्याचे देखील म्हटले. तसेच फुले एज्युकेशन तर्फे तेलंगाणा राज्यात 20 मार्च 22 ला परराज्यातील दुसरा सत्यशोधक विवाह आणि महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व अन्नपुरवठा मंत्री नामदार छगन भुजबळ यांच्या 15 ऑक्टोबर 22 ला 75 वा अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने 75 सत्यशोधक विवाह लावणार असल्याची माहिती देत नाव नोंदणी करण्यासाठी मदतीचे आवाहन देखील केले.
या वेळी सुरुवातीला वधु वर यांचे हातात राष्ट्रीय ग्रंथ भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाङमय घेऊन सभागृहात फुलांच्या सड्यावर आगमन केल्या नंतर त्यांचे शुभहस्ते थोरसमाजसुधारक महात्मा फुले आणि भारतीय स्त्री शिक्षणाच्या अध्यप्रनेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास तर सामाजिक क्रांतीचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वधु वर यांचे आई वडील यांचे शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.तर वधु वर यांना सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि फुले दांपत्याची फोटोफ्रेम पुणे बिबवेवाडी पोलीस स्टेशन च्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर यांचे हस्ते देण्यात आले.  त्यांनी देखील या परिवाराचे अभिनंदन करीत फुले एज्युकेशन च्या वतीने महाराष्ट्र व परराज्यात जाऊन मोफत सत्यशोधक विवाह लावतात म्हणून कौतुक केले.
या प्रसंगी राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे वधु वर यांचे आईवडील आणि मामामामी यांना हा आदर्श विवाह पार पाडला म्हणून विश्वस्त प्रा. सुदाम धाडगे यांचे हस्ते सन्मानपत्र दिले तर यावेळी धाडगे सर यांनी महात्मा फुले रचित मंगळाष्टकाचे गायन केले.
या सत्यशोधक विवाहाचे कार्य प्रबोधन पर माहिती देत विधीकर्ते सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी नेहमीप्रमाणे  महात्मा फुले यांचे वेशभुषेत पार पाडत उद्देशिका चे वाचन व सत्याचा अखंड गायला.तर आलेल्या मान्यवरांचे आभार आई शोभना गिरमे आणि स्मिता भिंगारे यांनी मानले मोलाचे सहकार्य प्रियंका भातलवंडे,मनोज गिरमे ,आकाश ढोक ,व हनुमंत टिळेकर यांचे लाभले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *