शिवछत्रपतींचे पहिले मंदिर कुठे आहे? पहिले मंदिर कर्नाटकात, तर पहिली मूर्तीशिल्पे आंध्र आणि तामिळनाडूत

लोकदर्शन👉संकलन – संध्या सुर्यवंशी. 9028261973.
साभार – प्रविण भोसले.
लेखक मराठ्यांची धारातीर्थ.

*आज १९ फेब्रुवारी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिम { 2022}

सन १९९९. छत्रपती शिवरायांचे सख्खे थोरले बंधू जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या शोधात असताना मी थारवाडच्या केंद्रीय पुरातत्व खात्याच्या (ASI) कार्यालयात गेलो होतो. संभाजीराजांच्या समाधीबद्दल तिथे काही माहिती मिळाली नाही. पण त्यांनी मला धारवाड जिल्ह्यातील यादवाड गावी शिवरायांची मूर्ती असल्याची आणि बेलवाडीच्या देसायांनी ही मूर्ती स्थापल्याची माहिती दिली. .धारवाडहून मी गदगला जाणार होतो. पण ही माहिती मिळताचं थेट बेलवाडीचा रस्ता पकडला. माझा हा प्रवास आधुनिक यात्रिक घोड्यावरून अर्थात मोटरसायकलवरून होता. धारवाडहून बेलवाडी २५ कि.मी. वर आहे. बेलवाडीच्या अलिकडे असलेल्या यादवाड गावी मी पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच अंधारात निगेटिव्हच्या साध्या कैमेन्याने फोटो घेतले. एवढ्या रात्री बेलवाडीला जाण्याऐवजी नंतर दिवसाउजेडी भेट देऊ असे ठरविले आणि तिथूनच गदगला जाण्यास परत फिरलो. ही १९९९ची माझी पहिली यादवाडची पहिली फेरी २००२ मधे कोल्हापूरचे प्रा. डॉ. वसंतराव मोरे यांचा ‘छत्रपती शिवाजी की साहित्यिक प्रतिमा’ हा पी.एच.डी.चा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित झाला. शिवछत्रपतींवरील हा हिंदी भाषेतील पी. एच. डी. चा पहिला प्रबंध आहे. ग्रंथात मोरे सरांनी यादवाड येथील मूर्तीची फोटोसह माहिती नमूद केली आहे. मोरे सरांनी पी.एच.डी. च्या प्रबंधासाठी स्वतः यादवाड व बेलवाडी येथे १९९९, २००० च्या सुमारास भेट देऊन, बेलवाडीच्या देसाई घराण्यातील वंशजांना भेटून या मूर्तीचा इतिहास स्थापना व पूजाविधी याची माहिती घेतली होती. याशिवाय मोरे सरांनी श्रीश्रील मल्लिकार्जुन येथील शिवाजी गोपूरमबद्दलची माहितीदेखील त्यांच्या ग्रंथात नमूद केली होती. २००२ ला मोरे सरांचा ग्रंथ माझ्या वाचनात आला. आता पुन्हा यादवाळ, बेलवाडीला जाणे व स्वतः सविस्तर माहिती घेणे मला भागच होते. २००३ साली पुन्हा हा योग आला. या भेटीची हकीकत सांगण्यापूर्वी या मूर्तीच्या स्थापनेमागील इतिहास अगोदर थोडक्यात नमूद करतो.

शिवरायांची दक्षिण भारतात स्वराज्याचा विस्तार करणारी दक्षिण दिग्विजय मोहीम ही शिवरायांच्या आयुष्यातील सर्वात मोठी सर्वाधिक काळ चाललेली आणि अत्यंत यशस्वी ठरलेली महत्वाची मोहीम आहे. डिसेंबर १६७६ ते मै १६७८ अशी दीड वर्ष ही मोहीम चालू होती. मोहिमेवरून परत येताना गदग लक्ष्मेश्वरच्या देसायांकडून नजराणा (खंडणी वसूल करून शिवराय तोरगळला आले. सैन्याची एक तुकडी धारवाड भागातून निघाली होती. या भागातील बेलचाडीच्या ईशप्रभू देसायाना निमूटपणे खंडणी देण्याची सूचना देण्यात आली. पण हे धुडकावून ईशप्रभूनी मराठा सैन्यातील दाणा वैरण गोळा करणाऱ्या टोळीवर हल्ला करून त्यातील बैल पळवून बेलवाडीच्या गढीत नेले. मागोमाग मराठ्याच्या सैन्यतुकडीने बेलवाडीवर धाव घेतली व गढीला वेळा घातला. (मार्च १६७८).

मराठ्यांचे हे सैन्य काही फार मोठे नव्हते. यांच्यासोबत तोफखाना नव्हता.

मुख्य सैन्य शिवरायांबरोबर तोरगळ येथे होते. तरीही मराठ्यांनी गढीवर हल्ले चालू केले. अशाच एका हल्ल्यात ईशप्रभू मारले गेले. मराठ्यांना आता गढ़ी आपल्या हातात आली असे वाटत असतानाच ईशप्रभूच्या पत्नी मल्लब्बा उर्फ सावित्रीबाई या स्वतः गढ़ी लडवू लागल्या. बेलवाडीतील इतर स्त्रियादेखील सैनिकांच्या बरोबरीने लठू लागल्या. सावित्रीबाईनी विलक्षण शौर्याने एक महिनाभर गढ़ी जिद्दीने लढविली. या लढाईची हकीकत त्याकाळी या भागात मोठ्या वेगाने पसरली. एक स्त्री मराठ्यांना हार जात नाही ही बातमी इंग्रजापर्यंतदेखील पोहोचली. हा सर्व प्रकार कळताच शिवराय स्वतः तोरगळहून बेलवाडीला आले. आता मात्र सावित्रीबाईंची हार निश्चित झाली होती. तरीही शरण न येता त्यांनी युध्दाचाच मार्ग पत्करला. मराठ्यांच्या सैन्यासमोर अखेर बेलवाडीच्या सैन्याचा पराभव झाला आणि सावित्रीबाईना कैद करण्यात आले. सावित्रीबाईंना यावेळी एक अल्पवयी पुत्रही होता.

सावित्रीबाईना शिवरायासमोर आणण्यात आले. त्याचवेळी सावित्रीबाई कैदेत असताना त्यांच्यावर सेखोजी नावाच्या सरदाराने बदनजर ठेवल्याचे कळताच

सतापलेल्या शिवरायानी सेखोजीचे डोळे काढण्याची शिक्षा फर्मावली,

मराठ्यांना निमूटपणे शरण न येता कडवी लढत देणाऱ्या सावित्रीबाईंना शिवराय आता काय शिक्षा करतात हे पाहण्यास उत्सुक असलेल्यांना शिवरायांनी अनपेक्षित आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सावित्रीबाईना माफ करून त्यांचा प्रदेश व गढ़ी पुन्हा त्यांनाच बक्षीस दिली. स्त्री असूनही मराठ्यांना शरण न जाता अखेरपर्यंत अगदी स्वतः कैद होईपर्यंत जिद्दीने स्वतः शस्त्र घेऊन युद्ध करणाऱ्या एका लढवय्या स्त्रीचा मान ठेवण्याने शिवरायांतील मोठेपणाचे, शौर्याांची कदर करण्याचे स्त्रीदाक्षिण्याचे गुणदर्शन सर्वांना घडले.

सावित्रीबाईना बहीण मानून शिवरायांनी त्यांना व त्याच्या लहान मुलाला ही अविस्मरणीय भेट दिली.

ह्या अनपेक्षित उपकाराने भारावलेल्या सावित्रीबाईना या घटनेचे चिरकाल स्मरण रहावे म्हणून त्यांच्या जहागिरीतील बेलवाडीजवळच्या यादवाड गावी शिवरायांचे छोटे मंदिर (घुमटी) बांधून त्यात शिवरायाची अत्यंत सुबक अशी अश्वारूढ मूर्ती दगडात कोरून घेऊन स्थापन केली व नित्यपूजा चालू केली. या मूर्तीमधे वरच्या भागात घोड्यावर बसलेले, हाती तलवार धारण केलेले शिवराय असून ते स्वतंत्र सार्वभौम छत्रपती झालेले असल्याने त्यांच्या डोक्यावर छत्रदेखील कोरलेले आहे. एक सेवक सूर्यपान (आफताबगिरी उर्फ अब्दागिरी) घेऊन उभा आहे. विशेष म्हणजे एक कुत्रेदेखील या शिलगत आहे. या कुत्र्याबद्दल स्पष्टीकरण देणे अवघड आहे पण शिवरायांच्या या शिल्पात सोबत है कुत्रे कोरले जाणे यामागे निश्चित काहीतरी ठाम कारण असावे. खालच्या भागात शिवराय सावित्रीबाईंच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन वाटीने दूध पाजत असल्याचा प्रसंग कोरलेला आहे. शेजारी सावित्रीबाई हात जोडून उभ्या आहेत. कडेला हा प्रसंग पाहणाऱ्या आणखी दोन व्यक्ती आहेत, जणूकाही या मुलाच्या दूधभातासाठीच शिवरायांनी बेलवाडी जहागीर परत सावित्रीबाईंना दिली असा उदात्त हेतू यातून व्यक्त होतो. (पुढील काळात जिंजी प्रांतातील सात लाख होनांचा प्रदेश आपले सावत्र बंधू एकोजीराजे यांना परत देताना तो शिवरायांनी एकोजीराजांना दूधभातासाठी देत आहोत असे नमूद केले होते.) अत्यंत उत्तम रीतीने शिल्पा कित केलेही ही मूर्ती शिवरायांच्या स्त्री दाक्षिण्याचे, लढवय्या स्त्रीच्या कौतुकाचे आणि सावित्रीबाईच्या कृतजतेचे स्मृतीशिल्पचिन्ह आहे.

२००३च्या माझ्या दौन्यातील माहिती आता सांगतो. यादवाडमधील जुन्या मारुती मंदिराच्या दर्शनी भितीला लागून ही मूर्ती स्थापलेली आहे. मूर्तीसाठी छोटी घुमटी बांधून वर छोटा कळस बांधला आहे. या घुमटीचा मूळचा लाकडी जाळीदार दरवाजा खराब झाल्याने नुकताच लोखडी जाळीचा दरवाजा बसविण्यात आला होता. सावित्रीबाईना १६७८ मधे हे छोटेखानी मंदिर बांधून नित्यपूजेची व्यवस्था लावल्याची माहिती मारूती मंदिराच्या पारंपरिक पुजाऱ्याने दिली. तेव्हापासून आजतागायत मारुतीच्या पूजेसोबतच ही मूर्ती रोज पूजली जाते, अगदी पाण्याने धुवून शैव पध्दतीने विभूतीचे आठवे पट्टे ओडून, दिवा अगरबत्ती लावून ही साथ पूजा होते मूर्तीचे फोटो काढून मी बेलवाडी गाठले. बेलवाडीच्या मुख्य चौकातील सावित्रीबाईचा अश्वारूढ पुतळा पाहून थेट गढ़ींच्या जागेवर पोहोचलो. सपाट मैदानात एक शाळा दिसत होती. शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. त्यांनी दोन वर्षांपूर्वीच गढ़ी जीर्ण झाल्याने भुईसपाट झाल्याचे सांगितले. मी कशासाठी आलो आहे हे समजताच त्यांनी तत्काळ देसाई घराण्याचे वंशज श्री. श्रीशैल आप्पा देसाई यांना शाळेत बोलावून घेतले. आता मला खात्रीशीर माहिती मिळू लागली. या देसायांनी शिवरायाची मूर्ती १६०८ ला खुद सावित्रीबाईंनी स्थापल्याची व नित्यपूजा चालू केल्याची माहिती दिली. स्थापनेपासून आजतागायत नित्यपूजा अखंड चालू असून आजही या पूजेसाठी पुजाऱ्याला ठराविक नेमणूक देसाई घराण्याकडून मिळते ही महत्त्वाची माहिती देसायांनी दिली. यादवाड गावी ही मूर्ती असण्याचे कारण ‘शिवरायांचा मुक्काम त्याप्रसंगी यादवाडमधे होता आणि शिवराय व सावित्रीबाईंची भेट यादवाडमधे झाली. ‘असेही देसायानी सांगितले ते अर्थात पटण्यासारखे आहे. शिवरायांनी तिथून निघताना आपली काही माणसे बेलवाडीत नेमली आणि या मराठ्यांचे वंशज आजही बेलवाडीत आहेत ही जादा माहितीदेखील मला मिळाली.

देसाई घराण्याने गढीची जागा शाळेसाठी दान देऊन शिवाय इमारतीसाठी मदत केली तसेच आज जिथे शाळा आहे. तिथेच पूर्वी सावित्रीबाईचा गढीतील वाडा होता हे मुख्याध्यापकांनी सांगितले. शिवाय संस्थेतर्फे काढण्यात आलेली बैलवाडीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी ‘वीरराणी मल्लव्या चरित्र’ ही स्मरणिका त्यांनी मला भेट दिली. ही स्मरणिका १९८९ सालची असून तिच्यात शिवरायांच्या यादवाडमधील मूर्तीची माहिती व फोटो छापलेला आहे. या सर्व माहितीचा सारांश असा की छत्रपती शिवरायांचे ते हयात असतानाच बांधले गेलेले पहिले मंदिर म्हणजे हे यादवाडमधील मंदिर छोटे का होईना कळसासह मंदिर बांधून दरवाजा बसवून त्यात मूर्ती स्थापन करून तिची नित्यपूजा यथायोग्य पध्दतीने चालू असेल तर ते मंदिरच म्हटले पाहिजे, म्हणजेच शिवरायांचे हे पहिले मंदिर ठरते. ●पाचसहा वर्षांपूर्वी २०१४-१५ साली मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी उतरविण्यात आले व तसेच शिवरायाचे शिल्पही काढून ठेवण्यात आल्याची माहिती मला समजली. आता श्रीशैल मल्लिकार्जुन येथील शिल्याची माहिती सागतो. भागानगर (गोवळकोंडा) इथे कुतुबशहाला भेटून शिवराय श्रीशैलला एप्रिल १६०७ मधे या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले. हे देवस्थान आंध्र प्रदेशातील कर्नूळ जिल्ह्यात आहे. नऊ दिवस शिवराय इथे पूजाअर्चसाठी थांबले. इथून निघताना भाविकांच्या सोयीसाठी कृष्णा नदीच्या तीरावर श्रीगंगेश नावाचा घाट आणि मंदिराच्या उत्तरेकडे भव्य गोपूर बांधण्याची व्यवस्था शिवरायांनी केली. हे गोपूर – शिवाजी गोपूरम या नावानेच ओळखले जाते. या गोपूरात प्रवेश करताच आपल्या डाव्या हाताच्या देवडीत भिंतीवर शिवरायांचे शिल्प आहे. तलवार दाढी व जिरेटोप ह्यावरून शिवराय लगेचच ओळखता येतात. शिवपिंडीच्या एका बाजूस शिवराय तर दुसऱ्या बाजूस आचार्य अथवा पुजारी दिसतात. प्रत्यक्ष मंदिराच्या महत्त्वाच्या वास्तूत, गोपूरात एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे शिल्प कोरले जाण्याचे हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण इथे आपल्याला दिसते. मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांनी गोपूर बांधताना त्यात शिवरायांचे शिल्प स्थापून मोपूराला ‘शिवाजी गोपूरम’ नाव दिले. या अद्वितीय सन्मानामागे कारण आहे शिवरायांचे अलौकिक युगप्रवर्तक व्यक्तीमत्व, त्यांचे गोपूर बांधण्याचे कार्य,

२००४ साली शिवरायांच्या दक्षिण मोहिमेच्या मार्गावरून प्रवास करीत असताना हे शिल्प मी पाहिले. तिथे चौकशी केली असता है गोपूर बांधण्यास तीन वर्ष लागली अशी माहिती मला श्रीशैल येथील मुख्य पुजाऱ्यापैकी एक असलेले मूळ सोलापूरचे रहिवासी असलेले श्री. देशमुख यांनी दिली, शिवकाळापासूनच हे घराणे श्रीशैल इथे पुजारी म्हणून आहे. गोपूरातील शिवरायाच्या मूर्तीची रोज पूजा होते आणि इथे म्हणल्या जाणाऱ्या आरतीमथे शिवरायाचेही नाव नमूद आहे. यादवाडमधील मंदिर पहिले म्हणायचे कारण असे की ते १६०८ मधेच पूर्ण झाले तर हे शिवाजी गोपूरम १६८० साली पूर्ण झाले व मग पूजा चालू झाली. तसेच शिवाजी गोपुरममधील है शिल्प देवडीच्या भिंतीवर कोरलेले आहे. मंदिरात असते त्याप्रमाणे ही स्वतंत्र .सुटी, अलग अशी मूर्ती नाही. श्रीशैल मंदिराच्या उत्तर दिशेला काही अंतरावर छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र ही आधुनिक काळातील वास्तू आहे. शिवरायांचे स्मारक असे याचे स्वरूप आहे. आत शिवछत्रपतींचा सिंहासनारूढ पुतळा आहे. पण इथे मंदिराप्रमाणे या पुतळ्याचा पूजाविधी होत नाही. त्यामुळे याला आपण मंदिर म्हणू शकत नाही. है एक स्मारक आहे. शिवरायाची आणखी एक मूर्ती पुष्पवनेश्वर येथील शिवमंदिरात आहे. २००४ च्या माझ्या दौऱ्यात मी ही मूर्ती पाहिली तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातून मला ही माहिती मिळाली होती. हे मंदिर तंजावरजवळच्या पुदुकोट्टाई जिल्ह्यातील तिरुपन्ती गावात आहे. मंदिरातील एका खांबावर अश्वारूशिवरायाची तलवारधारी मूर्ती आहे. जुलै १६७७ मधे या मंदिरातच शिवराय आणि त्याचे सावत्रबधू तेजावरनरेश एकोजीराजे भोसले यांची प्रथमच स्वतंत्र राजे या नात्याने सौहार्दपूर्ण भेट झाली. या भेटीची स्मृती म्हणून एंकोजीराजांनी नंतर शिवरायांची मूर्ती या मंदिरातील खांबावर कोरवली अशी माहिती तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातून मला मिळाली. हे खांबावरील
शिला दुर्मिळ असूनही अद्याप दुर्लक्षित आहे६९५ (शिवराया॑च्या मृत्यूनंतर यादवाडमधील मंदिरानंतर १७ वर्षांनी १६९५ साली (शिवरायांच्या मृत्यूनंतर १५ वर्षांनी छत्रपती राजाराम महाराजानी सिंधुदुर्ग किल्ल्यात श्रीशिवराजेश्वर मंदिर बांधून विधीवत पूजाअर्चा चालू केली. हे महाराष्ट्रातील शिवरायांचे पहिले मंदिर आहे. खुद शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले हे मंदिर असल्याने या मंदिराचे महत्व खूप मोठे आहे. चेन्नईमथील थंब चेद्री मार्गावरील कालिकांबा मंदिरात शिवराय १६७७ साली दर्शनासाठी गेले होते. या भेटीची माहिती व शिवरायाचे चित्र मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात लावलेले आहे तसेच उडपीमधील अंबलपाडी भागातील काली मंदिरातील एका खाबावर शिवरायाची अश्वारूढ मूर्ती कोरलेली आहे.

कै. रा. चिं. ढेरे यांनी ‘तुळजाभवानी’ या त्यांच्या ग्रंथात चेन्नई व उडपीमधील

मंदिरांबाबतची ही माहिती फोटोसह दिली आहे. शिवरायांच्या बसरूरवरील

पहिल्या आरमारी मोहिमेशी उडपीमधील मंदिराचा संबंध कै. डेरेनी जोडला

आहे. (मी स्वतः अद्याप या दोन ठिकाणी गेलेलो नाही.)

महाराष्ट्राबाहेर दक्षिण भारतात पूर्व किनाऱ्यावरील चेन्नई, पश्चिम किनाऱ्यावरील उडपी आंध्र प्रदेशातील श्रीशैल, दक्षिणेकडे तामीळनाडूमधील तेजावर आणि उत्तर कर्नाटकातील यादवाड अश्या टोकाच्या गावात असलेला शिवप्रभूचा प्रभाव आणि त्यांची स्मृती याची साक्ष देणारी ही शिल्पे कक्षाची प्रतीक आहेत? शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्याला अलौकिकत्वाला आणि अद्वितीयत्वाला लोकांनी देवतुल्य मानले हेच यातून दिसते, नाही का ? ● सिंधुदुर्ग किल्ल्यामधील श्रीशिवराजेश्वर मंदिरानंतर जवळपास दोनशे पथरा वर्षांनी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी शिवरायांची दोन मंदिरे बांधली. एक पन्हाळगडावर आणि दुसरे कोल्हापूरातील नर्सरी बागेत (साधारण द्वारा प्रवीण भोसले

सन १९९९. छत्रपती शिवरायांचे सख्खे थोरले बंधू जिजाऊपुत्र संभाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळाच्या शोधात असताना मी धारवाडच्या केंद्रीय पुरातत्व खात्याच्या (ASI) कार्यालयात गेलो होतो. संभाजीराजांच्या समाधीबद्दल तिथे काही माहिती मिळाली नाही. पण त्यांनी मला धारवाड जिल्ह्यातील यादवाड गावी शिवरायांची मूर्ती असल्याची आणि बेलवाडीच्या देसायांनी ही मूर्ती स्थापल्याची माहिती दिली. धारवाडहून मी गदगला जाणार होतो. पण ही माहिती मिळताच थेट बेलवाडीचा रस्ता पकडला. माझा हा प्रवास आधुनिक यात्रिक घोड्यावरुन अर्थात मोटरसायकलवरून होता. धारवाडहून बेलवाडी २५ कि.मी. वर आहे. बेलवाडीच्या अलिकडे असलेल्या यादवाड गावी मी पोहोचलो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते. मूर्तीचे दर्शन घेतले. तसेच अंधारात निगेटिव्हच्या साध्या कैमेयने फोटो घेतले. एवढ्या रात्री बेलवाडीला जाण्याऐवजी नंतर दिवसाउजेडी भेट देऊ असे ठरविले आणि तिथूनच गदगला जाण्यास परत फिरलो. ही १९९९ची माझी पहिली यादवाडची पहिली फेरी. २००२ मधे कोल्हापूरचे प्रा. डॉ. वसंतराव मोरे यांचा ‘छत्रपती शिवाजी की साहित्यिक प्रतिमा’ हा पी.एच.डी.चा प्रबंध ग्रंथरूपाने प्रकाशित झाला, शिवछत्रपतींवरील हा हिंदी भाषेतील पी.एच.डी.चा पहिला प्रबंध आहे. ग्रंथात मोरे सरानी यादवाड येथील मूर्तीची फोटोसह माहिती नमूद केली आहे. मोरे सरांनी पी.एच.डी.च्या प्रबंधासाठी स्वतः यादवाड व बेलवाडी येथे १९९९ २०००च्या सुमारास भेट देऊन, बेलवाडीच्या देसाई घराण्यातील वंशजांना भेटून या मूर्तीचा इतिहास, स्थापना व पूजाविधी याची माहिती घेतली होती. याशिवाय मोरे सरांनी श्रीशैल मल्लिकार्जुन येथील शिवाजी गोपूरमबद्दलची माहितीदेखील

त्यांच्या ग्रंथात नमूद केली होती.

२००२ ला मोरे सरांचा ग्रंथ माझ्या वाचनात आला. आता पुन्हा यादवाड़,

बेलवाडीला जाणे व स्वतः सविस्तर माहिती घेणे मला भागच होते. २००३ साली

पुन्हा हा योग आला. या भेटीची हकीकत सांगण्यापूर्वी या मूर्तीच्या स्थापनेल इतिहास अगोदर थोडक्यात नमूद करतो. शिवरायांची दक्षिण भारतात स्वराज्याचा विस्तार करणारी दक्षिण दिग्विजय’ मोहीम ही शिवरायांच्या आयुष्यातील सर्वांत मोठी, सर्वाधिक काळ चाललेली आणि अत्यंत यशस्वी ठरलेली महत्वाची मोहीम आहे. डिसेंबर १६७६ ते में २६७८ अशी दीड वर्ष ही मोहीम चालू होती. मोहिमेवरून परत येताना गदग लक्ष्मेश्वरच्या देसायांकडून नजराणा (खंडणी वसूल करून शिवराय तोरगळला आले. सैन्याची एक तुकडी धारवाड भागातून निघाली होती. या भागातील बेलवाडीच्या ईशप्रभू देसायांना निमूटपणे खंडणी देण्याची सूचना देण्यात आली. पण हे धुडकावून ईशप्रभूनी मराठा सैन्यातील दाणा वैरण गोळा करणाऱ्या टोळीवर हल्ला करून त्यातील बैल पळवून बेलवाडीच्या गढीत नेले. मार्गोमाग मराठ्यांच्या सैन्यतुकडीने बेलवाडीवर धाव घेतली व गढीला बैठा घातला. (मार्च १६७८).

मराठ्यांचे है सैन्य काही फार मोठे नव्हते. पांच्यासोबत तोफखाना नव्हता.

मुख्य सैन्य शिवरायाबरोबर तोरगळ येथे होते. तरीही मराठ्यांनी गढीवर हल्ले चालू केले. अशाच एका हल्ल्यात ईशप्रभू मारले गेले. मराठ्यांना आता गढ़ी आपल्या हातात आली असे वाटत असतानाच ईशप्रभूच्या पत्नी मल्लब्चा उर्फ सावित्रीबाई या स्वतः गढ़ी लढवू लागल्या. बेलवाडीतील इतर स्त्रियादेखील सैनिकांच्या बरोबरीने लढू लागल्या. सावित्रीबाईंनी विलक्षण शौर्याने एक महिनाभर गढ़ी जिद्दीने लढविली. या लढाईची हकीकत त्याकाळी या भागात मोठ्या वेगाने पसरली. एक स्त्री मराठ्यांना हार जात नाही ही बातमी इंग्रजापर्यंतदेखील पोहोचली.. हा सर्व प्रकार कळताच शिवराय स्वतः तोरगळहून बेलवाडीला आले.

आता मात्र सावित्रीबाईंची हार निश्चित झाली होती. तरीही शरण न येता त्यांनी

युध्दाचाच मार्ग पत्करला. मराठ्यांच्या सैन्यासमोर अखेर बेलवाडीच्या सैन्याचा

पराभव झाला आणि सावित्रीबाईना कैद करण्यात आले. सावित्रीबाईंना यावेळी एक अल्पवयी पुत्रही होता. सावित्रीबाईंना शिवरायासमोर आणण्यात आले. त्याचवेळी सावित्रीबाई कैदेत असताना त्यांच्यावर सेखोजी नावाच्या सरदाराने बदनजर ठेवल्याचे कळताच सतापलेल्या शिवरायांनी सेखोजीचे डोळे काढण्याची शिक्षा फर्मावली. मराठ्यांना निमूटपणे शरण न येता कडवी लढत देणाऱ्या सावित्रीबाईंना शिवराय आता काय शिक्षा करतात हे पाहण्यास उत्सुक असलेल्यांना शिवरायानी अनपेक्षित आश्चर्याचा धक्का दिला. त्यांनी सावित्रीबाईंना माफ करून त्याचा प्रदेश व गढी पुन्हा त्यांनाच बक्षीस दिली. स्त्री असूनही मराठ्यांन शरण न जाता अखेरपर्यंत अगदी स्वतः कैद होईपर्यंत जिद्दीने स्वतः शास्त्र घेऊन युद्ध करणाऱ्या एका लढवय्या स्त्रीचा मान ठेवण्याने शिवरायातील मोठेपणाचे, शौर्याची कदर करण्याचे स्त्रीदाक्षिण्याचे गुणदर्शन सर्वांना घडले, सावित्रीबाईंना बहीण मानून शिवरायांनी त्यांना व त्याच्या लहान मुलाला ही अविस्मरणीय भेट दिली.

ह्या अनपेक्षित उपकाराने भारावलेल्या सावित्रीबाईंना या घटनेचे चिरकाल स्मरण रहावे म्हणून त्यांच्या जहागिरीतील बेलवाडीजवळच्या यादवाड गावी शिवरायाचे छोटे मंदिर (घुमटी बांधून त्यात शिवरायांची अत्यंत सुबक अशी अश्वारूढ मूर्ती दगडात कोरून घेऊन स्थापन केली व नित्यपूजा चालू केली. र या मूर्तीमधे वरच्या भागात घोड्यावर बसलेले, हाती तलवार धारण केलेले शिवराय असून ते स्वतंत्र सार्वभौम छत्रपती झालेले असल्याने त्यांच्या डोक्यावर छत्रदेखील कोरलेले आहे. एक सेवक सूर्यपान जणूकाही या मुलाच्या दूधभातासाठीच शिवरायांनी बेलवाडी जहागीर परत सावित्रीबाईंना दिली असा उदात्त हेतू यातून व्यक्त होतो. (पुढील काळात जिंजी प्रांतातील सात लाख होनांचा प्रदेश आपले सावत्र बंधू एकोजीराजे यांना परत देताना तो शिवरायांनी एकोजीराजांना ‘दूधभातासाठी देत आहोत असे नमूद केले होते.)

अत्यंत उत्तम रीतीनें शिल्पांकित केलेही ही मूर्ती शिवराघाच्या स्त्री दाक्षिण्याचे, लढवय्या स्त्रीच्या कौतुकाचे आणि सावित्रीबाईंच्या कृतज्ञतेचे स्मृतीशिल्पचिन्ह आहे.

२००३च्या माझ्या दोन्यातील माहिती आता सांगतो, यादवाडमधील जुन्या मारुती मंदिराच्या दर्शनी भिंतीला लागून ही मूर्ती स्थापलेली आहे. मूर्तीसाठी छोटी घुमटी बांधून वर छोटा कजस बांधला आहे. या घुमटीचा मूळचा लाकडी जाळीदार दरवाजा खराब झाल्याने नुकताच लोखंडी जाळीचा दरवाजा बसविण्यात आला होता. सावित्रीबाईना १६०८ मधे हे छोटेखानी मंदिर बांधून नित्यपूजेची व्यवस्था लावल्याची माहिती मारूती मंदिराच्या पारंपरिक पुजाऱ्याने दिली. तेव्हापासून आजतागायत मारुतीच्या पूजेसोबतच ही मूर्ती रोज पूजली जाते. अगदी पाण्याने धुवून शैव पध्दतीने विभूतीचे आडवे पट्टे ओढून, दिवा अगरबत्ती लावून ही साग्र पूजा होते. मूर्तीचे फोटो काढून मी बेलवाडी गाठले.

बेलवाडीच्या मुख्य चौकातील सावित्रीबाईंचा अश्वारूढ पुतळा पाहून थेट गढीच्या जागेवर पोहोचलो. सपाट मैदानात एक शाळा दिसत होती. शाळेत जाऊन मुख्याध्यापकांची भेट घेतली. त्यांनी दोन वर्षापूर्वीच गढ़ी जीर्ण झाल्याने भुईसपाट झाल्याचे सांगितले. मी कशासाठी आलो आहे हे समजताच त्यांनी तत्काळ देसाई घराण्याचे वंशज श्री. श्रीशैल आप्पा देसाई यांना शाळेत बोलावून घेतले. आता मला खात्रीशीर माहिती मिळू लागली.

या देसायांनी शिवरायांची मूर्ती १६७८ ला खुद्द सावित्रीबाईंनी स्थापल्याची व नित्यपूजा चालू केल्याची माहिती दिली. स्थापनेपासून आजतागायत नित्यपूजा अखंड चालू असून आजही या पूजेसाठी पुजाऱ्याला ठराविक नेमणूक देसाई घराण्याकडून मिळते ही महत्त्वाची माहिती देसायांनी दिली. यादवाड गावी ही मूर्ती असण्याचे कारण शिवरायांचा मुक्काम त्याप्रसंगी यादवाडमधे होता. आणि शिवराय व सावित्रीबाईंची भेट यादवाडमधे झाली असेही देसायांनी सांगितले. ते अर्थात पटण्यासारखे आहे.

शिवरायांनी तिथून निघताना आपली काही माणसे बेलवाडीत नेमली आणि

या मराठ्यांचे वंशज आजही बेलवाडीत आहेत ही जादा माहितीदेखील मला

मिळाली.

देसाई घराण्याने गढीची जागा शाळेसाठी दान देऊन शिवाय इमारतीसाठीही मदत केली तसेच आज जिथे शाळा आहे तिथेच पूर्वी सावित्रीबाईंचा गढीतील बाडा होता है मुख्याध्यापकांनी सांगितले. शिवाय संस्थेतर्फे काढण्यात आलेली बेलवाडीच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी ‘वीरराणी मल्लव्वा चरित्र’ ही स्मरणिकर त्यांनी मला भेट दिली. ही स्मरणिका १९८९ सालची असून विच्यात शिवरायांच्या यादवाडमधील मूर्तीची माहिती व फोटो छापलेला आहे.

या सर्व माहितीचा सारांश असा की छत्रपती शिवरायांचे ते हयात असतानाच बांधले गेलेले पहिले मंदिर म्हणजे हे यादवाडमधील मंदिर छोटे का होईना कळसासह मंदिर बांधून दरवाजा बसवून त्यात मूर्ती स्थापन करून तिची नित्यपूजा यथायोग्य पध्दतीने चालू असेल तर ते मंदिर म्हटले पाहिजे. म्हणजेच शिवरायांचे हे पहिले मंदिर ठरते.

पाचसहा वर्षांपूर्वी २०१४-१५ साली मारुती मंदिर जीर्णोद्धारासाठी

उतरविण्यात आले व तसेच शिवरायांचे शिल्पही काढून ठेवण्यात आल्याची

माहिती मला समजली.

आता श्रीशैल मल्लिकार्जुन येथील शिल्याची माहिती सांगतो. भागानगर (गोवळकोंडा) इथे कुतुबशहाला भेटून शिवराय श्रीशैलला एप्रिल १६७७ मधे या प्रसिद्ध ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आले. हे देवस्थान आंध्र प्रदेशातील कर्नूळ जिल्ह्यात आहे. नऊ दिवस शिवराय इथे पूजाअर्चेसाठी थांबले. इथून निघताना भाविकांच्या सोयीसाठी कृष्णा नदीच्या तीरावर श्रीगंगेश नावाचा घाट आणि मंदिराच्या उत्तरेकडे भव्य गोपूर बांधण्याची व्यवस्था शिवरायांनी केली. हे गोपूर शिवाजी गोपूरम या नावानेच ओळखले जाते. या गोपूरात प्रवेश करताच आपल्या डाव्या हाताच्या देवडीत भिंतीवर शिवरायाचे शिल्प आहे. तलवार, दाढी व जिरेटोप ह्यावरून शिवराय लगेचच ओळखता येतात. शिवपिंडीच्या एका बाजूस शिवराय तर दुसऱ्या बाजूस आचार्य अथवा पुजारी दिसतात. प्रत्यक्ष मंदिराच्या महत्त्वाच्या वास्तूत गोपूरात एखाद्या विशिष्ट व्यक्तीचे शिल्प कोरले जाण्याचे हे अत्यंत दुर्मिळ उदाहरण इथे आपल्याला दिसते. मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांनी गोपूर बोधताना त्यात शिवरायांचे शिल्प स्थापून गोपूराला ‘शिवाजी गोपूरम’ नाव दिले. या अद्वितीय सन्मानामागे कारण आहे शिवरायांचे अलौकिक युगप्रवर्तक व्यक्तीमत्व, त्यांची स्वराज्यस्थापना, धर्मरक्षण सार्वभौम छत्रपतीपद

त्यांची महादेवभक्ती आणि गोपूर बांधण्याचे कार्य २००४ साली शिवरायांच्या दक्षिण मोहिमेच्या मार्गावरून प्रवास करीत असताना हे शिल्प मी पाहिले. तिथे चौकशी केली असता हे गोपूर बांधण्यास तीन वर्ष लागली अशी माहिती मला श्रीशैल येथील मुख्य पुजाऱ्यांपैकी

एक असलेले मूळ सोलापूरचे रहिवासी असलेले श्री. देशमुख यांनी दिली.

शिवकाळापासूनच हे घराणे श्रीशैल इथे पुजारी म्हणून आहे.

गोपूरातील शिवरायांच्या मूर्तीची रोज पूजा होते आणि इथे म्हणल्या जाणाऱ्या

आरतीमधे शिवरायांचेही नाव नमूद आहे. यादवाडमधील मंदिर पहिले म्हणायचे

कारण असे की ते १६०८ मधेच पूर्ण झाले तर हे शिवाजी गोपूरम १६८०

साली पूर्ण झाले व मग पूजा चालू झाली. तसेच शिवाजी गोपुरममधील है

शिल्प दैवडीच्या भिंतीवर कोरलेले आहे. मंदिरात असते त्याप्रमाणे ही स्वतंत्र सुटी, अलग अशी मूर्ती नाही. श्रीशैल मंदिराच्या उत्तर दिशेला काही अंतरावर छत्रपती शिवाजी स्फूर्ती केंद्र ही आधुनिक काळातील वास्तू आहे. शिवरायांचे स्मारक असे याचे स्वरूप आहे. आत शिवछत्रपतींचा सिंहासनारूढ पुतळा आहे. पण इथे मंदिराप्रमाणे या पुतळ्याचा पूजाविधी होत नाही. त्यामुळे याला आपण मंदिर म्हणू शकत नाही. है एक स्मारक आहे. शिवरायांची आणखी एक मूर्ती पुष्पबनेश्वर येथील शिवमंदिरात आहे. २००४

च्या माझ्या दौऱ्यात मी ही मूर्ती पाहिली. तजावरच्या सरस्वती महाल

ग्रंथालयातून मला ही माहिती मिळाली होती. हे मंदिर तजावरजवळच्या

पुदुकोट्टाई

जिल्ह्यातील तिरुपन्बूती गावात आहे. मंदिरातील एका खांबावर

अश्वारूशिवरायांची तलवारधारी मूर्ती आहे. जुलै १६०० मधे या मंदिरातच

शिवराय आणि त्यांचे सावत्रबंधू तंजावरनरेश एकोजीराजे भोसले यांची

प्रथमच स्वतंत्र राजे या नात्याने सौहार्दपूर्ण भेट झाली. या भेटीची स्मृती म्हणून

एकोजीराजानी नंतर शिवरायांची मूर्ती या मंदिरातील खांबावर कोरवली अशी

माहिती तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयातून मला मिळाली. हे खांबावरील

शिला दुर्मिळ असूनही अद्याप दुर्लक्षित आहे.

यादवाडमधील मंदिरानंतर १७ वर्षांनी १६९५ साली (शिवरायांच्या मृत्यूनंतर

१५ वर्षांनी छत्रपती राजाराम महाराजानी सिंधुदुर्ग किल्ल्यात श्रीशिवराजेश्वर

मंदिर बाधून विधीवत पूजाअर्चा चालू केली. हे महाराष्ट्रातील शिवरायांचे पहिले मंदिर आहे. खुद शिवपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी बांधलेले हे मंदिर अन्नईमधील बीमार्गावरील कालिकांबा मंदिरात शिवराय १६० असल्याने या मंदिराचे महत्व खूप मोठे आहे. साली दर्शनासाठी गेले होते. या भेटीची माहिती व शिवरायांचे चित्र मंदिर व्यवस्थापनाने मंदिरात लावलेले आहे तसेच उडपीमधील अंबलपाडी भागातील काली मंदिरातील एका खांबावर शिवरायांची अश्वारूढ मूर्ती कोरलेली आहे.

कै. रा. चिं. ढेरे यांनी तुळजाभवानी या त्यांच्या ग्रंथात चेन्नई व उडपीमधील मंदिरांबाबतची ही माहिती फोटोसह दिली आहे. शिवरायांच्या बसवरील पहिल्या आरमारी मोहिमेशी उडपीमधील मंदिराचा संबंध के टेरेनी जोडला आहे. (मी स्वतः अद्याप या दोन ठिकाणी गेलेलो नाही.) महाराष्ट्राबाहेर दक्षिण भारतात पूर्व किनाऱ्यावरील चेन्नई, पश्चिम किनाऱ्यावरील उडपी आंध्र प्रदेशातील श्रीशैल, दक्षिणेकडे तामीळनाडूमचील तंजावर आणि उत्तर कर्नाटकातील यादवाड अश्या टोकांच्या गावात असलेला

शिवप्रभूचा प्रभाव आणि त्यांची स्मृती याची साक्ष देणारी ही शिल्पे कशाची प्रतीक आहेत? शिवरायांच्या युगप्रवर्तक कार्याला अलौकिकत्वाला आणि अद्वितीयत्वाला लोकानी देवतुल्य मानले हेच पातून दिसते, नाही का ? सिंधुदुर्ग किल्ल्यामधील श्रीशिवराजेश्वर मंदिरानंतर जवळपास दोनशे पंधरा वर्षानी कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहूमहाराजांनी शिवरायांची दोन मंदिरे बांधली. एक पन्हाळगडावर आणि दुसरे कोल्हापूरातील नर्सरी बागेत (साधारण साल १९९०) ही मंदिरे आधुनिक काळातील शिवरायांची पहिली दोन मंदिरे

आहेत.

एखाद्या गावाने मिळून सार्वजनिक रित्या बांधलेले शिवरायाचे मंदिर माझ्या

माहितीनुसार राजणी (सैनिक), ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली येथील असावे.

(सन १९७६-७७). गेल्या पाचसात वर्षात काही गावात शिवरायांची मंदिरे

बाधली जात असल्याच्या पोस्ट सोशल मीडियात येत आहेत. शिवरायांच्या

दैवतीकरणाचा प्रवाह अजूनही सुरुच आहे हे यातून दिसते.

तीन वर्षांपूर्वी मी चाकणहून तळेगाव दाभाडे गावी जात असताना मला

सटुबरेजवळच्या गावात (या गावाचे नाव माझ्या लक्षात नाही. रस्त्यावरूनच

फोटो घेऊन मी पुढे निघालो.), एका मंदिराच्या शिखरावर शिवरायांची अश्वारूढ

तलवारधारी सिमेंटमधे बनविलेली मूर्ती दिसली. हे शिखर अगदी अलीकडे

बांधलेले आहे. शिखरावर महिषासुरमर्दिनीच्या शेजारीच शिवराय दिसतात.

शिवराय हयात असल्यापासून ते आजच्या काळापर्यंत त्यांना दैवतरूप कसे

प्राप्त होत गेले याचा हा धावता आढावा घेतल्यानंतर ‘यादवाडमधील मंदिर है

शिवरायांचे भारतातील म्हणा जगातील म्हणा, पहिले मंदिर आहे असा निष्कर्ष

माझ्या अभ्यासानुसार, योग्य ठरतो.

मी हा लेख इतका सविस्तर लिहायला कारणीभूत ठरली एक फेसबुकवरील कर्मेट. काही दिवसांपूर्वी शिवरायांचे पहिले मंदिर कोणते यावर माझे व एका इतिहासमित्राचे मतभेद झाले. केवळ त्या एका मित्राला उत्तर देण्यापेक्षा तुम्हा सर्वांनाच माझ्याकडील माहिती कळावी यासाठी ही स्वतंत्र पोस्ट मी केली आहे. इथे एक महत्वाची बाब नमूद करतो. एखाद्या घटनेवर, वास्तूवर वकिली पध्दतीने वादविवाद करताना आपले म्हणणे माउताना कित्येकदा लोकांचे त्या घटनेच्या अथवा वास्तूच्या ऐतिहासिक मोलाकडे, मतितार्थाकडे. त्यातून मिळणाच्या महत्वाच्या तत्वाकडे, निष्कर्षाकडे दुर्लक्ष होते. तसे या विषयाबाबत होऊ नये म्हणून या पोस्टमधील माहिती केवळ शिवरायांचे पहिले मंदिर कोणते?’ या प्रक्षापुरती मर्यादित न ठेवता शिवरायांच्या दैवतीकरणामागील मला आकळलेली कारणे नमूद करणे मला योग्य वाटते. ‘शिवरायांना देव मानावे की नाही यावर प्रत्येकाचे मत वेगळे असू शकते. देव

आहे का नाही हयावरदेखील मतभेद असू शकतात. पण शिवरायांना त्यांच्या हयातीपासूनच दैवतरूप आले होते हैं कुणीही नाकारू शकणार नाही. यामागे कारणीभूत होते शिवरायांचे स्वराज्यस्थापनेचे कार्य हे कार्य करीत असताना शिवरायाच्या अनेक देवतुल्य गुणांचा अनुभव तत्कालीन समाजाला येत होता. या गुणांच्या प्रभावामुळे शिवरायांना अगोदर देवावतार मानले गेले व पुढे थेट दैवतरूप मिळत गेले. कुणाही मानवाच्या शक्तीबाहेरील विचारापलीकडील ●अचाट, अफाट कृत्ये एकामागोमाग एक करणान्या आणि या सर्वामागे असलेला आपली मातृभूमी स्वतंत्र करण्याच्या आणि जनकल्याणाच्या ध्येयापासून कणभरली आणि क्षणभरही न ढळलेल्या युगप्रवर्तक शिवछत्रपतींना दैवतरुप मिळावे हे अटळ विधीनिखीतच होते. मध्ययुगीन भारताच्या इतिहासात आपल्या हयातीतच देवरूप प्राप्त झालेले

एकमेव स्वतंत्र राज्यनिर्माते म्हणजे ‘शककर्ते राजे शिवछत्रपती. त्याकाळी दक्षिण भारतात शिवरायांना देवतुल्य मानले जाण्यामागे कारणीभूत आहे दक्षिण भारत मोहीम दक्षिण भारतातील आदिलशाहीची सुलतानी सत्ता संपवून शिवरायांनी मोठा भूभाग स्वराज्याला जोडला, स्थानिक हिंदू सत्ताकडून केवळ खंडणी घेऊन त्यांच्याशी चांगले संबंध राखले श्रीशैल कालहस्ती, तिरुपती, अरुणाचलेश्वर, वृध्दाचलम, पुष्पबनेश्वर अशा अनेक महत्वाच्या मंदिरात शिवराय दर्शनास गेले, तिथे मुक्काम केला आणि दानधर्मही केला. सुलतानांनी पूजा बंद केलेली काही मंदिरे शिवरायांनी पुन्हा मुक्त करुन पूजा चालू केली. यामुळे स्थानिक लोक शिवरायांना आपले मानू लागले असल्यास नवल ते काय ? आपण सर्व एकच आहोत, आपल्या भूमीच्या रक्षणासाठीच हे कार्य चालू आहे आणि इथे आपलीच सत्ता असली पाहिजे हा महत्वाचा संदेश या मोहिमेतून शिवरायांनी दक्षिण भारताला दिला. दक्षिण भारतात केवळ प्रदेशच नव्हे तर दक्षिणीयांची मनेही शिवरायांनी जिंकली. अनेक मराठी घराणी या मोहिमेमुळे दक्षिण भारतात स्थायिक झाली. यामुळेच शिवराय आणि शंभूराजांच्या मृत्यूनंतर दक्षिण भारताने छत्रपती राजाराम महाराजांना साथ दिली. शिवरायांच्या अशा अलौकिक, अद्वितीय देवावतारस्वरूप कार्यामुळेच

शिवरायांना त्यांच्या हयातीतच दैवतरूप येत चालले होते.

*शिवराय सार्वकालिक, सर्वश्रेष्ठ, आदर्श आणि अतुलनीय राजे ठरले ते त्यांच्या व्यक्तीमत्वातील शौर्य, शील, धाडस, दूरदृष्टी नीतीमत्ता, बुद्धिमत्ता, प्रसंगावधान, अचूक निर्णयक्षमता, नेमका लोकसंग्रह या व अशा अनेक सद्रणांच्या संपूर्ण, सर्वोच्च आणि अभूतपूर्व संयोगाने, हेच शिवरायांचे ‘शिवराय असणे म्हणजेच “शिवरायपण’, सारांशाने सांगायचे म्हटले तर देवाला जसे ‘देवपण’ त्याच्या गुणामुळे, कार्यामुळे लाभते तसेच शिवरायांना त्यांच्या गुणामुळे कार्यामुळे लाभले आहे त्यांचे अद्वितीय असे ‘शिवराय’ पण असे हे शिवरायांचे ‘शिवरायपण’ कालपण, आजपण आणि उद्यापण. हे सार्वकालिक सत्य आहे. आणि या ‘शिवरायपणा’लाच तत्कालीन हिंदू समाजाने देवपण’ बहाल केले.*

संकलन – संध्या सुर्यवंशी. पुणे.
9028261973.
१९ फेब्रुवारी २०२२ .
साभार – प्रवीण भोसले.
लेखक मराठ्याची धारातीर्थ.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *