भारतीय जनता पक्षातर्फे वारं रूमची स्थापना।       

लोकदर्शन 👉 मोहन भारती।

भारतीय जनता पार्टी पुणे शहराध्यक्ष श्री.जगदीश मुळीक साहेब यांच्या नेतृत्वाखाली सध्या सुरु असलेल्या कोरोनाच्या लाटेचा सक्षमपणे मुकाबला करण्यासाठी पक्षातर्फे वार रुम/कोरोना कंट्रोल रुमची स्थापबना करण्यात आली.सदर कंट्रोल रुमला BJP CORONA TASK FORCE असे नाव देण्यात आले.
यासंदर्भात आज भारतीय जनता पार्टी पुणे शहर कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.सदर बैठक हि शहराध्यक्ष श्री.जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती.सदर बैठकिला Task Force चे मुख्य संयोजक श्री.विजय वरुडकर,नगरसेविका गायञीताई खडके,श्री.गणेश घोष सरचिटणीस पुणे शहर, श्री.चंद्रकांत पोटे चिटणीस पुणे शहर,श्री.नंदकुमार गोसावी ओबीसी मोर्चा पुणे शहर संपर्क प्रमुख,आणि ईतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत पक्षाच्या शहर पातळीवर असलेल्या विविध आघाड्या/मोर्चांवर काम करित असलेल्या कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली.यामध्ये पुढील मुदद्यांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
(1) पक्षाच्या शहर कार्यालयात पुढील 1/2 दिवसात 24×7 Helpline सेवा सुरु केली जाईल.
(2)वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ञ डाॅक्टरांचे पॅनल तयार करण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने प्रसिध्द तज्ञ डाॅ.कल्याण गंगवाल हे असतील.
(3) प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आणि प्रभागातील डाॅक्टरांचे पॅनल आणि हाॅस्पिटलनिहाय यादी करण्यात येईल.
(4)शहरातील कोरोना काळात गेल्या दोन वर्षांपासून काम करित असलेल्या विविध NGO चा डाटा तयार करावा असे ठरविण्यात आले.
(5) शहरातील 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांच्या लसीकरणासाठी पुढाकार घेणे.
(6) प्रभागनिहाय समिती तयार करुन प्रत्येक प्रभागात कोरोनामुक्त होण्यासाठी चर्चासञाचे आयोजन करावे असे ठरविण्यात आले.
(7) ईमर्जंन्सी साठी तात्काळ Ambulance ऊपलब्ध व्हावी यासाठी शहर पातळीवर आणि प्रभागनिहाय मोफत सेवा देत असलेल्या Ambulance ची यादी करण्याचे ठरवण्यात आले.
यामध्ये प्रामुख्याने खासदार आणि आमदार निधीतून वाटप करण्यात आलेल्या Ambulance ची यादी जिल्हाधिकारी कार्यालयातून घेण्याचे ठरवण्यात आले.
(8) महाराष्ट्र शासन आणि पुणे महापालिकेकडे समन्वय साधून प्रशासकीय मदतीसाठी कार्यकर्त्यांची समिती स्थापन करण्याचे ठरवण्यात आले.
वार्तांकन:-
🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री. नंदकुमार गंगाधर गोसावी,
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर संपर्क प्रमुख.
98230 21469

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *