वलगाव नवसारी रिंग रोड चौकाचे छत्रपती संभाजी राजे चौक नामकरण* *आ. सौ. सुलभाताई खोडके यांच्याहस्ते नामफलकाचे अनावरण

लोकदर्शन  👉 मोहन भारती


*⭕अपराजित योद्धा क्षात्रवीर संभाजी राजे यांचा राज्याभिषेक दिन साजरा*

*⭕मराठा सेवा संघ व इतर कक्षाचे आयोजन*

*अमरावती १६ जानेवारी* : वलगाव नवसारी रिंग रोड चौक ला छत्रपती संभाजी राजे चौक फलक अनावरण कार्यक्रम रविवार दिनांक १६ जानेवारी २०२२ रोजी पार पडला. १६ जानेवारी १६८१ रोजी छत्रपती संभाजी राजे यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता.. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती संभाजी राजे चौक फलक अनावरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्याही संकटा शिवाय मिळणारे यश हा विजय ठरतो. पण अनेक संकटांशी सामना करून मिळालेला विजय हा इतिहास घडवितो. या शब्दांना सार्थ ठरवित छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे. हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिध्द केले.त्यांचे कर्तृत्व व नेतृत्व हे सर्वांनाच प्रेरणादायी ठरणारे आहे.
त्यामुळेच वलगाव नवसारी रिंग रोड चौक ला छत्रपती संभाजी राजे चौक फलक अनावरण कार्यक्रम हा अल्पायुषी आयुष्यात २०१ लढाई लढलेल्या आणि एकही पराभूत न होणारा अपराजित योद्धा म्हणून ओळखले जाणारे छत्रपती संभाजी राजे यांना खऱ्या अर्थाने आदरांजली अर्पण करणारा ठरणारा आहे. या शब्दात आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपस्थितांना संबोधित केले. सर्वप्रथम छत्रपती संभाजी राजे यांचे प्रतिमपूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. तदनंतर आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी फित कापूत छत्रपती संभाजी राजे चौक नामफलकाचे जाहीर उद्याटन केले. यावेळी आमदार महोदय यांचे मराठा सेवा संघ जिल्हा शाखेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने यावेळी जिजाऊ वंदना सादर करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दरम्यान नगरसेवक प्रशांत डवरे यांनी आपण मनपाच्या विधी समितीचे द्वारे मंजुरात प्राप्त करीत मनपाच्या आमसभेत सुद्धा छत्रपती संभाजी राजे चौक नामकरण करण्यासाठी मंजुरात मिळविली. असल्याचे सांगितले.
मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष— अश्विन चौधरी यांनी आपल्या संबोधनात संस्कृत चे ज्ञानी, निर्णयक्षमता असणारे, प्रचंड शौर्यशाली नेतृत्व म्हणजे छत्रपती संभाजी राजे होय. असे सांगितले. तर वयाच्या १४ व्या वर्षी बुद्धभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून त्यांनी आपले संस्कृतचे ज्ञानाचे दर्शन सर्वांना त्याकाळी घडवून आणले असल्याचे सांगितले.
यावेळी आमदार सौ. सुलभाताई खोडकेंसमवेत नगरसेविका निलिमा काळे, प्रदेश पदाधिकारी शिवमती कांचन उल्हे, किर्तीमाला चौधरी, जिजाऊ ब्रिगेड च्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख शिवमती क्षिप्रा मानकर, यांच्यासह मनाली तायडे, मैथिली पाटील, श्रद्धा पाटील , सुषमा बर्वे, मंजुषा ठाकरे, शुभांगी वसू , प्रा. डॉ. वैशाली गुडधे, हर्षा ढोक, कांचन मुरके, वृषाली जाधव, श्रद्धा गाले, वैशाली जाधव, प्रज्ञा राठोड, रीना राठोड, लक्ष्मी उमेकर, शिल्पा काळे, श्वेता मानकर, रेखा जाणे, सविता भुयार, विद्या देशमुख, संजीवनी देशमुख, प्रतिभा पुंडकर, मंगला बोडके, प्रिया घोंगडे, अर्चना इंगोले, क्षमा इंगोले, प्रणाली घाटे, लीना देशमुख, संगीता इंगोले, अर्चना देशमुख, रेखा तट्टे, शुभांगी देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, मराठा सेवा संघाचे शिवश्री अरविंद गावंडे, चंद्रकांत मोहिते, अश्विन चौधरी, नगरसेवक प्रशांत डवरे, प्रशांत महल्ले , यश खोडके, संजय ठाकरे, संजय ढोरे, राजेंद्र अढाऊ, हरिभाऊ लुंगे, बंडुपंत भुयार, हरिदास उल्हे, इंजिनिअर प्रदीप अंधारे, रवी मोहोड, गजानन चौधरी, विजय चौधरी, श्रीकृष्ण बोचे, सतीश काळमेघ, एम. व्ही. देशमुख, भाष्करराव ठाकरे, प्रकाश राऊत, विशाल भगत, प्रशांत उर्फ गुड्डू धर्माळे, प्रा. सुधाकर विघे, एन. एम. मोरे, वैभव निचळ, उदय काकडे, निखिल घुरडे, महेंद्र गाडेकर, एच. जी मांडवे, प्रा. जयंत इंगोले, दीपक कोरपे, प्रा. विजय काळे, प्रा. नरेश पाटील, भोजराज काळे, वामनराव शेंडे, निलेश ठाकरे, राजेंद्र कुर्हेकर, के. बी. पाटील, दिनकरराव काळे, तुळशीराम माने, ऍड. सुनील बोळे, नंदकिशोर काळस्कार, अविनाश कडू, गणेशराव वसू, मोहन पुंडकर, दिगंबर टोळे, मनीष पाटील पथ्रोटकर, अरुण चौधरी, नंदकुमार चौधरी, इंजि. आनंद जवंजाळ, प्रशांत गावंडे, प्रा. डॉ. प्रफुल गुडधे, राजेश बर्वे, शिवाजी बुरंगे, विलास देठे, राजेश कोरडे, संतोष चिंचलकार, संतोष गाळे, विनोद ढोलवाडे, दत्ता कथिलकर, कैलास देशमुख, दत्तात्रय बागल, सुरेश भेटाळू, योगेश सवई, सुयोग्य तायडे, दिलीप साखरे, आर. एन. भटकर, आर. एस. चर्पे, रवींद्र इंगोले, सुनील कुकडे, गोपाळ पळस्कार, नंदकिशोर रडके, नितीन तट्टे, अविनाश राठोड, नितीन तायडे, श्याम मानकर, संदीप वानखडे, सुरेंद्र गावंडे, हरिहर केने, पुरुषोत्तम गावंडे, रवी देशमुख, बबलू ढोरे, छोटू खंडारे, सचिन दळवी, गजानन पागृत, रामेश्वर चर्पे, निलेश लबडे, पिंटू मानकर, माजी नगरसेवक प्रवीण मेश्राम, सचिन शाह, प्रदीप दिवाण, अभिषेक धुरजड, आकाश हिवसे, श्रेयस पेठे, शुभम गवई, अजिंक्य मोरे, वेदांत गावंडे, दिनेश देशमुख, बंडू निंभोरकर, प्रशांत पेठे, राजेश कोरडे, निलेश शर्मा, प्रशांत काळपांडे, श्रीराम पानसरे, प्रशांत यावले, अनंत जगताप, आकाश वडनेरकर, राजेंद्र ठाकरे, प्रशांत इंगोले, श्याम मानकर, राजेश उमेकर, निरंजन राठोड, महेश देशमुख, राजेंद्र देशमुख, श्रीपाद टोहरे आदींसहित मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड सह अन्य पक्षाचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांसह स्थानीय परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक बांधव प्रामुख्याने उपस्थित होते. छत्रपती संभाजी महाराज चौक फलक अनावरण सोहळ्याचे सूत्रसंचालन व आभार मराठा सेवा संघ चे प्रवक्ता चंद्रकांत मोहिते यांनी मानले. यावेळी तुमचं आमचं नातं काय- जय जिजाऊ जय शिवराय ,….. रक्तारक्तात भिनलंय काय -जय जिजाऊ जय शिवराय च्या जयघोषाने यावेळी आसमंत दणाणून गेला होता ..

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *