तब्येत कुरकुर करते, गोळ्या खात जगण्यात काय मजा? रोज 3 गोष्टी करा, राहा फ्रेश -दिसा मस्त.

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
21 फेब्रुवारी 2022.

आपला आहार-विहार योग्य असेल तर आपण मनानी आणि शरीरानी फ्रेश राहू शकतो. पण त्यासाठी योग्य नियोजन, संतुलित आहार आणि शरीराची किमान हालचाल होणे गरजेचे असते…पाहूयात उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असणाऱ्या ३ गोष्टी कोणत्या…
ठराविक वेळेला आपल्याला तहान लागते, भूक लागते, काहीतरी चांगले पोटभरीचे खावेसे वाटते पण कामाच्या नादात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिथेच आपल्या शरीराचे नुकसान व्हायला सुरुवात होते.
स्ट्रेचिंग करणे, घरात असू तर सूर्यनमस्कार करणे, सकाळी किंवा संध्याकाळी किमान १५ ते १० मिनीटांसाठी मोकळ्या हवेत चालायला जाणे यांसारख्या गोष्टी आपण नक्कीच करु शकतो.

आपले आरोग्य उत्तम असेल तर आपण आनंदी आणि फ्रेश राहू शकतो. सगळ्या गोष्टींचा आनंद घेता यावा यासाठी आपली तब्येत चांगली असणे आणि मनाने आपण फ्रेश राहणे गरजेचे असते. आता हे जरी खरे असले तरी नेहमी फ्रेश राहण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी नेमके काय करायला हवे असा प्रश्न आपसूकच आपल्या मनात येईल. पण नियमितपणे काही ठराविक गोष्टी केल्यास आपण शरीराने आणि मनाने फ्रेश राहण्यास मदत होते. इतकेच नाही तर पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ यांचे संतुलन साधण्यासाठी योग्य नेमके काय करायला हवे याविषयी…

१. सकाळ – संध्याकाळचे योग्य नियोजन करा

तुम्ही तुमची सकाळ आणि संध्याकाळ यांचे योग्य पद्धतीने नियोजन केले, तर तुमचा पूर्ण दिवस चांगला जाण्यास मदत होईल. सकाळी झोपेतून उठल्यावर किमान व्यायाम करणे, हेल्दी ब्रेकफास्ट करणे आणि दिवसभराचे नियोजन करणे ही महत्त्वाची कामे आवर्जून व्हायला हवीत. सकाळी झोपेतून उठल्यावर आपण फ्रेश असतो, त्या वेळात आळस केला तर संपूर्ण दिवस आळसात जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी आळस न करता फ्रेश राहायला हवे. तसेच संध्याकाळी दिवसभराची कामे करुन थकल्यावर काही वेळ कुटुंबाला देणे, मित्रमंडळींमध्ये घालवणे, ध्यान करणे, रात्री झोपताना मोबाईल न पाहता काही वाचन किंवा आपल्या आवडीच्या गोष्टी करणे यामुळे झोपताना आपला मूड फ्रेश राहण्यास मदत होऊ शकते.

२. शरीराची हालचाल होणे महत्त्वाचे

सध्या आपल्यातील अनेकांची कामे ही दिवसभर बसून करण्याची आहेत. याबरोबरच आपल्याला म्हणावी तितकी कष्टाची कामेही आता नसतात. त्यामुळे आपण जे अन्न खातो ते योग्य पद्धतीने न पचल्याने पचनाच्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे आपले शरीर, मन फ्रेश राहत नाही. मात्र शरीराची पुरेशी हालचाल झाल्यास आपण फ्रेश राहतो. आपल्याला ठराविक वेळेला जीममध्ये जाऊन व्यायाम करायला जमेलच असे नाही. पण मधल्या वेळात ऑफीसमध्ये उभ्या- उभ्या काही स्ट्रेचिंग करणे, घरात असू तर सूर्यनमस्कार करणे, सकाळी किंवा संध्याकाळी किमान १५ ते १० मिनीटांसाठी मोकळ्या हवेत चालायला जाणे यांसारख्या गोष्टी आपण नक्कीच करु शकतो. त्यामुळे शरीर आणि मन फ्रेश राहू शकते.

३. चांगला आणि संतुलित आहार घेणे

उत्तम संतुलित आहार हा उत्तम आरोग्यासाठी आणखी एक महत्त्वाचा घटक असतो. ताण घालवण्यासाठी आणि फ्रेश राहण्यासाठी मनापासून जेवणे आवश्यक असते. आपल्यातील अनेक जण कधी काम करत जेवतात तर कधी मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवतात. त्यामुळे जेवणाकडे लक्ष लागत नाही आणि आपले सगळे लक्ष इतर गोष्टींकडेच राहते. मात्र जेवताना तुम्ही पूर्णपणे जेवणाकडे लक्ष देऊन जेवल्यास त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा होतो. ठराविक वेळेला आपल्याला तहान लागते, भूक लागते, काहीतरी चांगले पोटभरीचे खावेसे वाटते पण कामाच्या नादात आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिथेच आपल्या शरीराचे नुकसान व्हायला सुरुवात होते. मात्र आपल्या आतून आलेले म्हणणे ऐकून त्यानुसार योग्य तसा आहार घेतल्यास तो अंगी लागतो आणि आपण तंदुरुस्त राहण्यास मदत होते.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
21 फेब्रुवारी 2022.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *