पालकत्व स्वीकारुन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास आजन्म कारावास*

 

लोकदर्शन👉राजेंद्र मर्दाने*

 

*वरोरा* :- अल्पवयीन मुलीचे वडील हयात नाहीत म्हणून तिचे पालकत्व स्वीकारून तिच्याच घरी राहणाऱ्या भागवता इंद्रपाल केवट ( वय ४५ वर्षे ) या नराधमाने पीडितेची आई मजुरीला जात असल्याचा गैरफायदा घेत पीडीताला धमकावून तिच्यावर जबरी लैंगिक शोषण करत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने वरोरा येथील विशेष न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी आरोपीला लैंगिक अत्याचारासह वेगवेगळ्या कलमाखाली मंगळवारी मृत्यू पर्यंत जन्मठेप व दंडाची शिक्षा ठोठावली. डिसेंबर २०१८ मधील ही घटना असून माजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबतची माहिती अशी की, पीडित मुलगी मागील दोन वर्षांपासून आपल्या आईसोबत एकता नगर माजरी कॉलरी येथे नझूलच्या जागेवर बांधलेल्या झोपडीसारख्या घरात राहते तत्पूर्वी ते ग्राम – नरवली, ता. किशनपूर, जि. फत्तेहपूर ( उत्तर प्रदेश ) येथे राहत होती. आई – वडील मोलमजुरी करीत होते. लहान असतानाच तिचे वडील वारले होते. अशातच दोन मोठ्या भावंडांसह घराची जबाबदारी एकट्या आईवर आली. मुले मोठी होत असताना अल्पशा मजूरीत उदरनिर्वाह करणे कठीन जात होते. तेव्हा माजरी येथील नातेवाईकाने रोजगारासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील माजरी कॉलरीला येण्याचा सल्ला दिला. इथल्यापेक्षा दोन पैसे अधिक मिळून पोटापाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून दोन वर्षांपूर्वी माजरी गावात आली. दोन्ही मोठे भाऊ कामाच्या शोधात मुंबई, सूरतला निघून गेले. तेव्हापासून घरच्यांशी त्यांचा संबध नाही. पीडिता आपल्या आईसोबत मजूरीला जात होती. माजरी येथे राहणाऱ्या व मच्छीमारी व्यवसाय करणाऱ्या भागवता इंद्रपाल केवट या दूरच्या नातेवाईकाशी पीडिताच्या आईचा संपर्क आल्याने बोलचाल वाढत गेली. त्यावेळी अल्पवयीन मुलींचे पालनपोषण करण्याची जबाबदारी भागवता केवट याने उचलल्याने तो पीडितेच्या घरीच राहत होता. पीडीता आईसोबत सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मजुरीला जायची तर भागवता केवट सायंकाळी ६.०० ते सकाळी ७.०० वाजेपर्यंत वर्धा नदीत मासेमारीसाठी जात होता, असा दिनक्रम ठरला होता. परंतु जेव्हा पीडीताची आई कामासाठी दूर शेतावर जायची तेव्हा ती पीडीताला घरीच सोडून जात असे. घटनेच्या एक महिन्यापूर्वी अशीच पीडीता एकटी घरी असताना मासेमारी करून घरी आलेल्या भागवताने तिच्या समोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. पीडिताने नकार देताच त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. ती घरी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने अनेकदा जबरीने लैंगिक शोषन करत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले व घटनेबाबत कोणालाही सांगितल्यास तिला जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेच्या चार दिवस अगोदर आरोपीने पीडीतासोबत जबरी अत्याचार केला व मारण्याची धमकी दिली. जबरदस्तीने होत असलेल्या शारीरिक ,मानसिक त्रास व लैंगिक शोषणाच्या प्रकाराची माहिती पीडीताने आपल्या आईला कथन केली. तेव्हा आईने आरोपीशी झगडा केला असता तिला सुद्धा जीवे मारण्याची धमकी दिली. शेवटी पीडितेच्या आईने मुलीला घेऊन २१ डिसेंबर २०१८ च्या रात्री माजरी पोलीस स्टेशन गाठले व आरोपी भागवता केवट विरूद्ध लैंगिक शोषणाची तक्रार नोंदवली. फिर्यादीच्या तक्रारी वरुन माजरी पोलिसांनी २२ डिसेंबर २०१८ ला अपराध क्र. ३९५/१८ व भादंवी कलम , ३७६ ( २), (एफ) (जे) (के) (एन ) ५०६ भादंवी, तसेच कलम ४ व ६ बाल लैंगिक अत्याचार अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद करून घेतला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा तपास पो.उ.नि शुभांगी जी. ढगे, भद्रावती (पो. स्टे) यांनी करून आरोपी याच्या विरुद्ध सबळ पुरावे गोळा करून वरोरा येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात ८ विविध साक्षीदार तपासण्यात आले होते. मंगळवार ( १५ फेब्रुवारीला) या केसचा अंतिम निकाल लागला. आरोपी विरूद्ध आरोप सिद्ध झाल्याने वरोरा येथील विशेष न्यायाधीश डी.के भेंडे यांच्या न्यायालयाने आरोपी भागवता इंद्रपाल केवटला विविध कलमा खाली नैसर्गिक मृत्यूपर्यंत आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली व ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. मिलिंद देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली. कोर्ट पैरवी म्हणून सहायक फौजदार साईनाथ पद्मईकर यांनी कामकाज पाहिले.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *