कर थकबाकीमुळे अंचलेश्वर वॉर्डातील दुकान गाळे सील

लोकदर्शन 👉 मोहन भारती

– ⭕मनपा कर वसुली व जप्ती पथकाची कारवाई

चंद्रपूर, ता. १७ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली व जप्ती पथकाने दि. १७ फेब्रुवारी २०२२ ला अंचलेश्वर वॉर्ड येथील मालमत्ता धारकाच्या निवासासह दुकान यावर सन २०१५-१६ ते २०२१-२२ पर्यंतचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे जप्ती कार्यवाही केली व दुकानास सील लावण्यात आले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून कर वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
वारंवार सूचना देऊनही कर न भरणाऱ्या आणि टाळाटाळ करणाऱ्या दुकानदारांचे गाळे सील करण्याची कारवाई सुरू आहे.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वसुली व जप्ती पथकाने दि. १७ फेब्रुवारी २०२२ ला अंचलेश्वर वॉर्ड येथील मालमत्ता क्र. 2U-193 या मालमत्ता धारकाच्या निवासासह दुकान यावर सन २०१५-१६ ते २०२१-२२ पर्यंतचा मालमत्ता कर थकीत असल्यामुळे जप्ती कार्यवाही केली व दुकानास सील लावण्यात आले. अंचलेश्वर-२ येथील मालमत्ता क्र. २t-५ आणि भिवापूर येथील मालमत्ता क्र. २N-३१५ या निवासी मालमत्ता धारकांनी जप्ती पथकास सकारात्मक प्रतिसाद देऊन कर भरणा करुन जप्ती कार्यवाही टाळली.

ही कारवाई कारवाई मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनाखाली झोन 2 चे प्रभारी सहायक आयुक्त नरेंद्र बोबाटे, वार्ड लिपिक पारेलवार, शिपाई भावरकर व सुरक्षा रक्षक यांनी केली.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *