ब्रेस्ट कॅन्सरचं कारण ठरतात साधी वाटणारी ५ लक्षणं; गंभीर आजार टाळण्यासाठी वेळीच जाणून घ्या*

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

फारशी माहीत नसलेली लक्षणं ठरू शकतात ब्रेस्ट कॅन्सरचे कारण, जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला.

स्तनाच्या कर्करोगाचे (Breast Cancer) निदान जितक्या लवकर होईल, तितका हा रोग बरा होण्याची शक्यता जास्त असते, हे खरेच आहे. स्तनाच्या कर्करोगाची सुरुवातीच्या अवस्थेमध्ये त्याची स्पष्ट लक्षणे ठळकपणे दिसून येत नाहीत. या कर्करोगाची स्तनामधील गाठ तुम्हाला न जाणवण्याइतपत लहान असेल, तर तुम्हाला हा रोग झाला असल्याचे लक्षातही येणार नाही; तथापि, कालांतराने, तुम्हाला स्तनामध्ये तीव्र वेदना आणि दुखरेपणाचा अनुभव येऊ लागला, तर मात्र तुम्ही ते तपासून पाहिले पाहिजे. डॉ. भाविषा घुगरे (सल्लागार, सर्जिकल ऑन्कॉलॉजी, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल) यांनी या आजाराच्या लक्षणांबाबत अधिक माहिती दिली आहे.

कर्करोगाचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा हा रोग शोधणे ही सर्वात महत्त्वाची बाब ठरते. हा रोग सुरुवातीच्या टप्प्यात आढळला, तर तुम्हाला जगण्याची चांगली संधी आहे, असे मानता येते. तुम्हाला पुढीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास, आजच तुमच्या डॉक्टरांची भेट घ्या!

१. आकार किंवा पोत यांमध्ये बदल –

तुमच्या स्तनांपैकी एकामध्ये गाठ असेल, तर या बाधित स्तनाच्या आकारात किंवा आकारमानात लक्षणीय बदल होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, एक स्तन ओघळलेला असू शकतो किंवा दुसऱ्यापेक्षा मोठा होऊ शकतो. स्तनाच्या त्वचेवर सुरकुत्या असतील किंवा स्तनावर लालसर रंग वा फुगीरपणा दिसू लागल्यास त्यांची तपासणी करून घ्यायला हवी.

कोण म्हणतं व्हेज खाण्यातून प्रोटिन मिळत नाही, ४ पदार्थ रोज खा; फिट राहा

२. स्तनाग्र जाड होणे –

आपले स्तन नियमितपणे तपासण्याची तुम्हाला सवय असेल, तर स्तनांमधील छोटे बदलही त्वरीत ओळखणे तुम्हाला शक्य होईल. तुमच्या स्तनाग्रांपैकी एक किंवा दोन्ही नेहमीपेक्षा जाड वाटत आहेत का? याचे उत्तर होय असेल, तर तुम्ही त्याची चाचणी करून घेऊ शकता. याचबरोबर, त्वचेवरील खडबडीतपणा आणि खाज याकडेही दुर्लक्ष केले जाऊ नये, कारण या लक्षणांमधून तुमचे शरीर तुम्हाला काही संकेत देत असते.

३. स्तनाग्रांतून स्त्राव –

हे खरे, की स्तनाग्रांतून स्त्राव निघण्याची कारणे वेगवेगळी असतात आणि बहुतांश वेळा त्यांत काळजी करण्यासारखे काहीच नसते; तथापि, जर स्तनाग्र न पिळतादेखील त्यातूंन स्त्राव होत असेल किंवा तो दोन्हीपैकी कोणत्यातरी एकाच स्तनातून होत असेल, तर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटण्याची गरज आहे. या स्त्रावामध्ये रक्त आढळल्यास, वैद्यकीय मदत घेण्याचा सल्ला दिला जातो.

शरीर संबंधानंतर लघवीला जाणं का गरजेचं? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं? जाणून घ्या

४. काखेत गाठ –

अनेकदा स्त्रिया त्यांच्या स्तनांमध्ये गुठळ्या शोधतात. तरी त्यांनी कॉलरबोन किंवा काखेच्या आसपास आलेल्या एखाद्या सुजेकडे दुर्लक्ष करू नये. काहीवेळा स्तनामध्ये गाठ येण्याच्या अगोदर कॉलरबोन किंवा काखेत गाठी येत असतात. हे लक्षण लक्षात येताच वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा.

५. पोट फुगणे –

अनेक महिलांमध्ये पोट फुगण्याची सहज प्रवृत्ती असते. या लक्षणाकडे सहसा दुर्लक्ष केले जात असले, तरी पोट फुगण्याबरोबरच वजन कमी होणे किंवा रक्तस्त्राव हे त्रास होत असल्यास, त्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सतत पोट फुगलेले असणे हे निश्चितच कर्करोगाचे लक्षण आहे. या समस्येचे कारण जाणून घेण्यासाठी आपल्या डॉक्टरांना भेट द्यावी. एकदा या लक्षणांचे व्यवस्थित निदान झाले, की तुमचे डॉक्टर तुम्हाला मॅमोग्राम करवून घेण्याचा सल्ला देतील. सर्व वयोगटातील महिलांनी त्यांच्या स्तनांची नियमित तपासणी करून घेतली पाहिजे.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *