

लोकदर्शन 👉 अशोक गिरी
भंडारा:-(दि.२ जानेवारी) कोरोना महामारीच्या कालखंडात संपूर्ण राज्य होरपळून निघत असताना आता मात्र सर्वच क्षेत्रात शासनाने स्थानिक परीस्थितीनुसार शिथिलता जाहीर केली आहे.परंतु शाळा माञ बंद आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचेा फार मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे याबाबत शासन स्तरावर मागणीचा जोर बघता नुकतेच इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यास स्थानिक प्राधिकरणाच्या संमतीने मान्यता प्रदान केली आहे. त्यानुसार नुकतेच नववी ते बारावीचे वर्ग सुरू असताना त्याच धर्तीवर पहिली ते आठवीचे वर्ग देखील सुरु करावे व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे अशा मागणीचे निवेदन राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ शाखा भंडारा यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात अधिक्षक साहेबराव राठोड तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांना दिले.यावेळी अधिकारी महोदयांनी तर “माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवातले हे पहिलेच पञ आहे,जिथे शिक्षक शाळा सुरु करा म्हणून निवेदन देत आहे” अशा शब्दात निवेदनाचे कौतुक करुन स्विकृत केले.येत्या आठ दिवसात विचार करुन शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. यावेळी संघाचे कार्याध्यक्ष दशरथ जिभकाटे,कोषाध्यक्ष सुरेश मोहबंसी,प्रवक्ता अशोक गिरी,महिला प्रतिनिधी स्मिता गालपाडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.