

लोकदर्शन ÷ शिवाजी सेलोकर
गडचांदूर। ÷
येथिल नगर परिषद क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नाली चे बांधकाम सुरू आहे परंतु अनेक ठिकाणी न प ने ठरवून दिलेल्या मापदंडानुसार योग्य काम होतांना दिसून येत नसल्याने येथील
भाजयुमो चे तालुका अध्यक्ष रोहन काकडे यांनी माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देऊन लक्ष वेधले होते। गडचांदूर येथील विकास कामात होत असलेली दिरंगाई, भ्रष्टाचार व निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याने नागरिक व व्यापारी वर्ग सुद्धा त्रस्त झाले आहे। नगरसेवक किंवा न प चे अभियंता या कडे फिरकून सुद्धा पाहत नसल्याने दर्जा खालावलेला आहे। ठेकेदाराला ठरून दिलेल्या मानकानुसार काम होत नसल्याने सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी चंद्रपूर चे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। तसे पत्र मुख्याधिकारी याना सुद्धा पाठविण्यात आले आहे।
गडचांदूर ते घोडामगुडा रस्त्याचे डांबरीकरण साठी एक वर्ष अगोदर भूमिपूजन झाले परंतु एक वर्षाचा कालावधी लोटून सुद्धा फक्त खडीकरण झाले, डांबरीकरण केव्हा होणार याबाबत जनतेकडून प्रश्न विचारले जात आहेत।
नगरपरिषद मध्ये सावळा गोंधळ सुरू असून
नगरसेवक यांचाही कर्मचाऱ्यांवर पाहिजे तेवढा प्रभाव दिसून येत नाही, त्यावरून मोठया प्रमाणात भ्रष्टाचार होत असून सर्वजण एकमेकांना दबून असल्याचे बोलले जात आहे