गडचांदूर मधील वॉर्ड क्रमांक 03 मध्ये सामूहिक मकरसंक्रात साजरी

By : Mohan Bharti

गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथील , गोरे ले आउट, वार्ड क्रमांक 3 येथे सामूहिक मकर संक्रात नुकतीच साजरी करण्यात आली, या कार्यक्रमा मध्ये जुन्या संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले, सांसारिक प्रपंच चालवायला ज्या ज्या वस्तू गरजेच्या असतात त्या सर्व वस्तूने पंडाल सजविण्यात आले, दगडी जात्या पासून तर दगडी खळा पर्यंत विविध वस्तू ठेवण्यात आल्या , लहान मुलींनी सुद्धा या कार्यक्रमात हजेरी लावली त्यात त्यांनी नृत्य व नाटकाचे सादरीकरण केले.
स्त्रिया पारंपारिक वस्त्र परिधान करून वाण वस्तुंचे आदान प्रदान केलेत, कार्यक्रमाचे संचालन सौ. कल्पना खरवडे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी रित्या पार करण्या साठी सौ. रुपाली खामनकर, सौ वैशाली गोरे, सौ रक्षणदा खामनकर, सौ प्रियंका गोरे व इत्यादी स्त्रियांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here