वेकोलीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी वेकोलीने संपादित कराव्यात.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕नंदकिशोर वाढई यांची खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

राजुरा :– वे. को.ली बल्लारपूर क्षेत्राने मौजा माथरा, भडांगपूर परिसरातील अधिसुचित क्षेत्राची योजना तयार केलेली असून त्यानुसार परिसरातील संपादन करावयाच्या शेतजमीनी, त्याचे स्वरूप इ. नकाशासहीत तयार केलेला आहे. सदर नकाशाचे अवलोकन केल्यास प्रस्तावित सास्ती विस्तारीत खुल्या खाणीच्या अगदी आजुबाजुला निवेदनकर्त्या शेतक-यांच्या जमीनी असून त्या शेतजमीनी चे वेकोली संपादित करीत नसल्याचे प्राथमिक दृष्टया आढळुन येत आहे. त्यामुळे खाणी लगतच्या या शेतजमीनी वेकोलीने संपादित केल्यास शेतक-यांना खुप हाल अपेष्टा भोगाव्या लागणार आहेत.
प्रस्तावित खाण ही खुली कोळसा खाण असल्याने त्याचा कार मोठा फटका लगतच्या शेतक-यांना बसणार आहे. ब्लॉस्टींगचे हादरे, धुळ प्रदुषण, मातीचे ढिगारे, त्यातून विविध कारणाने नजिकच्या शेतात येणारी माती, दगड व सर्व प्रकारचे प्रदुषण, त्यातून होणारे प्रचंड नुकसान हे स्थानिक शेतकऱ्यांना परवडणारे नाहीत. सास्ती, गोवरी येथे असे अनुभव शेतकऱ्यांना आलेले आहेत. त्यामुळेच त्याचीच पुनरावृत्ती इकडेही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतक-यांच्या उत्पादनात कमालीची घट होणार आहे. शिवाय शेताच्या समोर पूर्व दिशेला जंगल असल्याने आम्हा शेतक-यांना शेतात जायला रस्ताही उरणार नाही. तसेच सदर विस्तारीत खाणीच्या योजनेत नाला व सड़क संपादि करण्याचे प्रस्तावित असल्याने सडकही बंद होईल. उर्वरीत नाला अनैसर्गीकपणे वळतीकरण करण्याची शक्यता असल्याने त्याचे दुष्परिणाम शेतक-यांना भोगावे लागणार आहे. गोवरी परिसरातील शेतक-यांना अलिकडेच नैसर्गीक नाला कुत्रिमरित्या वळतीकरण केल्यामुळे बँक वीटरचा फटका बसून परिसरातील हजारों एकर शेतीला पुराचा तडाखा बसला तीच परिस्थिती माथरा व शिवारातील शेतीवर ओढविण्याची दाट शक्यता आहे.
त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करता आणि गोवरी, पोवनी, साखरी परिसरातील शेतक-यांचे वाईट अनुभव व वास्तवीक स्थिती लक्षात घेता सास्ती विस्तारीत खुल्या खाणी लगतच्या मौजा माथरा येथील शेतक-यांच्या जमीनी संपादित करणे आवश्यक व न्यायसंगत आहे. त्यामुळे सास्ती विस्तारीत खुल्या कोळसा खाणी लगतच्या मौजा माथरा येथील शेतक-यांच्या शेतजमीनी सुध्दा वेकोलीने संपादित कराव्यात अशी मागणी काँग्रेस ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस आणि कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या प्रसंगी त्यांच्या सोबत माथराचे माजी सरपंच लहु चहारे, दिनकर वासेकर, हरिचंद्र चहारे आणि अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *