महात्मा गांधी विद्यालयाच्या सोनल फाये व अंजली राठोड ची दौड स्पर्धा प्रशिक्षण साठी निवड।   

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर,,
जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे खेलो इंडिया अंतर्गत मैदानी दौड स्पर्धा प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत,
या प्रशिक्षण करिता महात्मा गांधी विद्यालयाच्या धावपटू कु,सोनल फाये(वर्ग 9क) व कु,अंजली राठोड (वर्ग 9क)यांची निवड झाली आहेत,या प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थ्यांमधून 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये निवड होणार आहेत,
दौड स्पर्धा प्रशिक्षण साठी निवड झाल्याबद्दल सोनल फाये व अंजली राठोड यांचा 8 जानेवारी ला महात्मा गांधी विद्यालयात मुख्याध्यापिका सौ,स्मिता चिताडे व संस्थेचे प्रभारी धनंजय गोरे, यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला,याप्रसंगी संस्थेचे ,उपमुख्याध्यापक अनिल काकडे,पर्यवेक्षक एच, बी, मस्की,शोभाताई जीवतोडे, क्रिडा शिक्षक बबन भोयर,संजय झाडे व इतर शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते,

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *