

लोकदर्शन 👉 मोहन भारती
⭕आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते विविध प्रमाणपत्रांचे वाटप.
कोरपना :– महाराजस्व अभियान अंतर्गत तहसील कार्यालय कोरपनाच्या माध्यमातून मौजा मांडवा येथे शासन आपल्या दारी ही भुमिका घेऊन नागरिकांना उपयोगी दाखले, प्रमाणपत्रे यांचे आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यात शैक्षणिक दाखले, जातीचे प्रमाणपत्र, नानक्रिमिलियर, अधिवास प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, तसेच अन्य कामाकरिता उपयोगी पडणारे शेतकरी दाखला, ज्येष्ठ नागरिक दाखला, अल्पभूधारक प्रमाणपत्र, भुमिहिन प्रमाणपत्र, नवीन रेशनकार्ड/ शिधापत्रिका इत्यादी प्रमाणपत्रे नागरिकांना आदिंचा समावेश होता. तसेच वैद्यकीय विभागाअंतर्गत येथे कोविंड लसीकरण करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी उपसभापती सिंधुताई आस्वले, जि. प. सदस्य विनाताई मालेकर, उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, तहसिलदार महेंद्र वाकलेकर, गटविकास अधिकारी बैरमवार, जुगल पाटील जुमनाके, सिताराम कोडापे, सुरेश पा. मालेकर, संभाजी पा. कोवे, लक्ष्मीबाई, नायब तहसीलदार प्रवीण चिडे, अन्नपुरवठा विभागाचे निरीक्षक सविता गंभीरे, तालुका कृषी अधिकारी दमाले, वैद्यकीय अधिकारी डॉ. तरुणी मॅडम तलाठी, मंडल अधिकारी, पंचायत समिती विभागाचे अधिकारी, पत्रकार व गावकरी मंडळी उपस्थित होते.