तहसील मधील बाबुच्या दंडेलशाही ने शेतकरी अडचणीत

लोकदर्शन 👉 काज्जूम कुरेशी


⭕*तहसील कार्यालयात त्या कनिष्ठ लिपिकावर बडतर्फ करण्याची शेतकऱ्यांची मागणी*

घाटंजी ÷दि ३०/१२ २०२१घाटंजी तहसील मध्ये कार्यरत असलेले कनिष्ठ लिपिक राहुल हामंद यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे शेतकऱ्यांना खुप मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. घाटंजी तालुक्यात अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे याच अनुषंगाने शासनाने अतिवृष्टीची मदत जाहीर केली आहे, मात्र ती मदत पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बॅंक, तहसील, तलाठी यांच्या कडे येरझारा माराव्या लागत आहे. वास्तविक सामाईक क्षेत्र असलेल्या सातबाऱ्यातून सर्वांच्या संमतीने एका व्यक्तीला पैसे देण्यास काही हरकत नाही, अशा व्यक्तींना बॅंक सर्वांची समंती घेऊन शेतकऱ्यांना पैसे देऊ शकते.परंतु अशा प्रकरणांमध्ये अडकलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे तहसील प्रशासनाने आपल्या कडे वळते करून घेतले आहे. हा संशयास्पद प्रकार आहे. या गंभीर प्रकाराबाबत घाटंजी येथील दैनिक मतदार वृत्तपत्राचे प्रतिनिधी कज्जुम कुरेशी यांनी संबंधित वादग्रस्त बाबु राहुल हामंद यांची भेट घेतली असता तुम्ही माझी कलेक्टर कमिश्नर कडे तक्रार करा अशे उद्धटपणे बोलून बोळवण केली, हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून सामान्य माणसाला माणसाला न्याय मिळणे आता कठीण झाले आहे. एकीकडे शेतकऱ्यांना 50 टक्क्याच्या आत उत्पादन झाले आहे, कशीतरी शासनाची मिळालेली तुटपुंजी मदत तरी आपल्या पदरात पडावी या आशेवर शेतकरी तहसील मध्ये चकरा मारत आहेत, परंतु राहुल हामंद सारखे तहसील मध्ये शेतकऱ्यांना उर्मटपणे वागणूक देत असेल तर शेतकऱ्यांनी आता कुणाकडे न्याय मागावा असा प्रश्न आहे. अशे निगरगट्ट आणि उर्मटपणे शेतकऱ्यांशी वागणूक देणाऱे क्लर्क राहुल हामंद यांच्यावर कडक कार्यवाही करून खातेनिहाय चौकशी करावी अशी मागणी दैनिक मतदार चे प्रतिनिधी कज्जुम कुरेशी यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *