मानोली खुर्द जिल्हा परिषद शाळेच्या वतीने बाल आनंद मेळावा साजरा

By : Mohan Bharti

गडचांदूर : अतिदुर्गम डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या जि. प.उच्च प्राथमिक शाळा,मानोली खुर्द येथे बाल आनंद मेळावा चे आयोजन नुकतेच करण्यात आले ,यावेळी विद्यार्थ्यांनी विविध पाक कृती व हस्तवस्तूचे 45 प्रकारचे स्टॉल लावले होते. फुगडी,एकपायी,विंटूदांडू,कंच्या पारंपारिक खेळाना उजाळा व आनंद घेत ,कोविड लसीकरणाची जनजागृती करत बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन केंद्रप्रमुख विलास देवाळकर, यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी शा. व्य. स.अध्यक्ष शंकर रामटेके,मु.अ.जि. व्ही.पवार जेष्ठ नागरिक ,पोलीस पाटील ,गाव पाटील,तंटामुक्ती अध्यक्ष, मा.जि. प.सदस्य, सरपंच,उपसरपंच, सदस्य,उपस्थित होते, विद्यार्थ्यांचे पदार्थ खरेदी करून व आस्वाद घेऊन बाल आनंद मेळाव्याला प्रोत्साहन दिले, सकाळी शाळेच्या वेळ व्यतिरिक्त ७.००ते १०.०० वाजे पर्यंत गावातील चौकात खरेदी विक्री करून माझी कमाई,माझी मिळकत या उपक्रमातून व्यावहारिक ज्ञान प्रत्यक्ष अनुभूती मेळाव्यात घेतली ,स्टॉल च्या मध्यमातून विध्यार्थी व पालकांनी नावीन्यपूर्ण पाककृतीचा आस्वाद घेतला राष्ट्रीय गणित दिनानिर्मित बाल आनंद मेळाव्यात विद्याथी व शिक्षकांचे कौतुक मान्यवरांनी केले. या उपक्रमाचे नियोजन गट शिक्षणाधिकारी विजय परचाके शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सोयाम, व राजेश पवार यांनी केले ,आनंद मेळावा यशस्वीतेसाठी सीता मेश्राम, संध्या थिपे, प्रतिभा रायपूरे व मानोली वासीयानी परिश्रम घेतले

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *