महात्मा गांधी विद्यालय नांदगाव( सुर्या )येथे अपुर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन

By : Mohan Bharti

गडचांदूर – महात्मा गांधी विद्यालय, नांदगाव (सूर्याचा) येथे गणीत तज्ञ डाँ.श्रीनिवासन रामानुजन यांच्या जयंती निमित्त गणीत रांगोळी व अपुर्व विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी जागृत होण्याच्या उद्देशाने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ६३ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.यावेळी परिक्षक म्हणुन जुबेदा सय्यद व गिता वाकळे यांनी काम पाहले.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवाज शेख द्वितीय श्रुती आगलावे तृतीय क्रमांक उदय ठावरी.यांनी पटकीवला ,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक साईनाथ मेश्राम होते प्रमुख पाहुणे म्हणुन सौ.माधुरी मस्की ,विजय डाहुले उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शामकांत पिंपळकर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी मनोहर चौधरी संजय थेरे यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here