जिल्हा परिषद शाळा मानोली येथे गणित जत्रा चे अयोजन,,

By : Mohan Bharti

गडचांदूर : विपुन भारत अभियान अंतर्गत जि.प.उच्च प्राथ.शाळा,मानोली खुर्द येथे राष्ट्रीय गणित उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.श्रीनिवास रामानुजन (गणित तज्ञ) यांच्या जयंती निमित्त शाळेत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले, गणित चिंन्हाकित रांगोळी स्पर्धा, राष्ट्रीय व काॅपरेटीव बॅक स्लिप भरणे,गणित उखाणे, गणित कविता, मोबाईल फोन ऑपद्वारे गणित कोडी स्पर्धा, व विविध प्रकारच्या दुकानांची स्टाॅल मांडणी करुन विद्यार्थी व्यावसायिक व व्यावहारीक देवाणघेवाणीतून गणित ओळख करून घेतले अवघड वाटणारा विषय आनंदाने समजून घेतला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री. जि. व्ही.पवार होते उदघाटन, सौ. थिपे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख मार्गदर्शक सौ. सिता मेश्राम, कु. रायपुरे व वनपाल सोयाम तसेच शा. व्या. स. अध्यक्ष शंकर रामटेके यांनी आजच्या काळात गणिताचे महत्त्व वेगवेगळ्या गोष्टीतून स्पष्ट केले, कार्यक्रम चे सुत्रसंचालन सुप्रीम व संस्कृती या विद्यार्थिनीने केले,आभार प्रदर्शन शाळेचे मुख्यमंत्री यश नैताम यांनी केले,, गणित विषय शिक्षक राजेश पवार यांनी कार्यक्रमाचे सुनियोजित आयोजन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here