श्रीयंश चापले च्या वाढदिवसानिमित्त बाळु आहार किटचे वितरण.


लोकदर्शन 👉 मोहन भारती

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा रामपूर येथील श्रीयांश गौरव चापले च्या प्रथम वाढदिवसानिमित्य चापले कुटुंबियांच्या वतीने १० कुपोषित बाळांना बाळू सकस आहार किट भेट देण्यात आले. यात सास्ती येथील रियांशी मडावी, शिवांश रोगे, धूर्वा भोयर, धारा बोनसुले, धोपटाळा येथील महेंद्र रासकोंडा, दिलांशु टेकाम, गोयेगाव येथील क्रिश काळे, धोपटाळा टाऊनशीप येथील शिवंण्या मेटघरे, आराध्या जर्णेर, मुठरा येथील सुघम आत्राम आदिंचा समावेश आहे.
या प्रसंगी सेवा कलश फाउंडेशन राजुराचे अध्यक्ष अभिजित धोटे, गौरव चापले , उद्धव चापले, शिला उद्धव चापले, सुनीता गौरव चापले व संपूर्ण चापले कुटूंबीय, अक्षय सूर्तेकर, सुपरवायझर नवरखेडे मॅडम, अंगणवाडी सेविका व कुपोषित बालकांचे पालक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here