चंद्रपूर जिल्ह्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे २७ रिक्त पदे त्वरित भरा

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

*⭕आमदार प्रतिभाताई धानोरकर यांची पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे मागणी*

चंद्रपूर : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. ग्रामीण भागात पशु कोणत्या रोगाने ग्रस्त असल्यास त्यांवर उपचार करण्याकरिता वेळेवर पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसतो. त्यामुळे उपचार अभावी अनेक पशु दगावल्याच्या घटना समोर आल्या आहे. जिल्ह्यात २७ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

शेती सोबत जोड धंदा म्हणून पशु पालन करण्यात येते. रोगराई मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या शेतीचे हंगाम सुरू असून या काळात पशु दगावल्यास शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. त्यासोबतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात योजना राबवित असतात. त्यांची अंमलबजावणी होण्याची गरज असते. अनेक लाभार्थी त्या योजनेपासून वंचित राहत असल्याचे तक्रारी येत असतात. शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी त्या योजनेची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात यावी व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनेचा लाभ मिळण्याकरिता प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी पशु वैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे. शेतकरी त्यांच्या गुरांची योग्य काळजी जरी घेत असले तरी त्या गुरांना आरोग्य सेवा पुरविण्याची जबाबदारी शासनाने पशुधन विकास विभागाकडे सोपविली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात पशु वैद्यकीय २७ पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील मोजक्याच वैद्यकीय अधिकाऱ्यावर हा भार आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील गुरांचा आरोग्याच्या धोका देखील वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात २७ पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असून तात्काळ भरण्याची मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *