पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त

भाजयुमोव्दारा सांसदीय कार्याची चित्रमय प्रदर्शनी व आरोग्यवर्धक दुधाचे वाटप

चंद्रपूर:- पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता युवा मोर्चा महानगर चंद्रपूर व्दारा हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्यकाळातील विकासात्मक कार्यासंबंधी चित्रमय प्रदर्शनी लावण्यात आली तसेच वाढदिवसाचे औचित्य साधत हल्दीमिश्रीत, आरोग्यवर्धक दुधाचे नागरीकांना वितरण करून उत्साहपूर्ण वातावरणात वाढदिवस साजरा करण्यात आला. स्थानिक गिरणार चैक येथे दि. 11 नोव्हेंबर 2021 रोजी लोकहितैषी नेतृत्व असलेले हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो व्दारा आयोजित चित्रप्रदर्शनीस हंसराज अहीर यांनी स्वतः भेट देवून या प्रदर्शनीचे अवलोकन केले. लोकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहु अशी पुनश्च ग्वाही दिली. या कार्यक्रमास माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, भाजपा नेते विजय राऊत, खुशाल बोंडे, राजेंद्र गांधी, मधुसुदन रूंगठा, भाजयुमोचे प्रदेश उपाध्याक्ष रघुवीर अहीर, राजु घरोटे, मोहन चैधरी, वसंता देशमुख, राजु अडपेवार, संदीप कीरमे, विनोद शेरकी, राजेंद्र खांडेकर, बाळु कोतपल्लीवार, राजु येले, चंद्रकलाताई सोयाम, वंदना तिखे, शितल कुळमेथे, रवि चहारे, प्रमोद शास्त्रकार, अरूण तिखे, गणेश गेडाम, नाना श्रीरामवार, बाळु कोलनकर, पुनम तिवारी, अतुल रायकुंडलीया, राहुल गायकवाड, राजेंद्र तिवारी, महेश अहीर, गौतम यादव, चंदन पाल, विशान गिरी, राम हरणे, राहुल बोरकर, क्रिष्णा चंदावार, राजेश वाकोडे, अंकीत जोगी, पराग मलोडे, जितेश सोनटक्के, अक्षय दांडेकर, राहुल सुर्यवंशी, शुभम मेश्राम, समाधान उराडे, प्रणय डंबारे, निलेश खोल्हापुरे, सुदामा यादव, मनोहर राऊत, विशाल गोरे, जगदीश दंडेले, विशाल बुरडकर, अॅड.सारीका संदुरकर, प्रा. रवि जोगी, ललीत गुलानी, अमोल नगराळे, चंदन पाॅल, यश बांगळे, प्रविन नरमशेट्टीवार, प्रविन चुनारकर, मनीश बांगडे, मोन्टु ठक्कर, नकुल आचार्य, कार्तीक मुसळे, प्रसाद काटपल्लीवार, सागर घरोटे, जितु शर्मा, मोहीत आत्राम, देवा बुरडकर, अनुज सोनी, श्रेयश घरोटे, कमलेश आवळे, शिवम देशवाले तसेच चंद्रपूर जिल्हा जीम अॅंड हेल्थ क्लब असोसीएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर हे न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात. कमीतकमी खर्च करून आणि इतरांवर आर्थिक भार न टाकता हे पोर्टल आम्ही सुरू ठेवले असून वाचकांचे प्रचंड सहकार्य मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *