कळमना येथे वेकोली मार्फत खनिज विकास निधी उपलब्ध करून द्यावा.

By : Mohan Bharti

नंदकिशोर वाढई यांची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा कळमणा हे गाव वेकोली बल्लारपूर क्षेत्राच्या गोवरीडीप खदान पासून फक्त २ किलोमीटर अंतरावर आहे. गोवरी डीप खदानीमुळे कळमना वासियांना प्रदुषण, ब्लॉस्टींग व वेकोलीच्या बोगदयांमुळे, मातीच्या ढिगाऱ्यांमुळे डुक्कर, निलगाय, व वाघ या प्राण्याची दहशत सहन करावी लागत आहे. शेतक-यांचे उभ्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे वेकोलीच्या कोळसा खाणींमुळे पाण्याची पातळी खालावली आहे. कारण वेकोलीच्या खाणी ५०० मीटर खोल असल्यामुळे मौजा कळमना येथे डिसेंबर महिन्यामध्येच सगळ्या बोर, विहिरी आटुन पाण्याची बिकट समस्या निर्माण होते. त्यामुळे कळमना व परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी वेकोलीने येथे समस्या सोडविण्यासाठी तसेच विविध विकास कामांसाठी सामाजिक दायित्व अंतर्गत सि.एस.आर च्या माध्यमातून विकास निधी उपलब्ध करावा यासाठी कळमना ग्रामपंचायतीचे माध्यमातून वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा वेकोलीने अजूनही लक्ष घातलेले नाही. तरी या सगळ्या बाबींची दखल घेऊन पालकमंत्री म्हणून आपण वेकोली प्रशासनाकडून कळमना येथे खनिज विकास निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी कळमनाचे सरपंच, काँग्रेसच्या ओबीसी आघाडीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा अ. भा. सरपंच परिषदेचे विदर्भ सरचिटणीस नंदकिशोर वाढई यांनी महाराष्ट्राचे बहूजन कल्यान, खार जमिनी विकास, मदत व पुर्नवसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या प्रसंगी काँग्रेसचे ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस उमाकांत धांडे, आदिवासी नेते तथा भुरकुंडा बु. चे सरपंच नामदेव कुमरे, महादेवराव ताजणे माजी उपसरपंच कळमना, लहुजी चाहारे माजी सरपंच माथरा, कवडु पाटील सातपुते माजी सरपंच खामोना, राकेश हिंगाने सरपंच कडोली बु, जाधव उपसरपंच भुरखुडा बु, विठ्ठल राव वाढई, केशव आडे बंडु पाटील पहानपटे आदींची उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *