

लोकदर्शन👉 मोहन भारती
राजुरा :– मौलाना आझाद वार्ड, राजुरा येथे नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या अध्यक्षतेखाली महिला काँग्रेस कार्यकारिणी गठित करण्यात आली.
यात अध्यक्षपदी समीना मतिन कुरेशी यांची निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, सदस्य यांच्या नावांची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा तथा नगरसेविका संध्या चांदेकर, मतीन कुरेशी, निसार बेग, जया विनोद आरमुलवार, मुबाशीरा कुरेशी, निकीशा काझी, अनिता पुटलवार, कल्पना मडावी, मिराबाई आगलावे, रेहाना शेख, बिलकिंस बानो, सिदाबानो शेख, शालु आरमुलवार, शांताबाई आसमपल्लीवार, ललिता इंपावार, आर्शीया कुरेशी, नझीया कुरेशी, कौशर कबीर कुरेशी यासह मौलाना आझाद वार्ड येथील अनेक महिला कार्यकर्त्यां उपस्थित होत्या.