कोरपण्यात वार्डवासियानी पकडले अवैद्य दारूचे वाहन

लोकदर्शन 👉 मोहन भारती

कोरपना – अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणारे चारचाकी वाहनासह देशी दारू वार्डवासियानी पकडून पोलिसांना स्वाधीन केल्याची घटना शुक्रवार दिनांक ५ ला सकाळच्या सुमारास कोरपना येथे घडली.
गेल्या अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याची चर्चा होती. यावर महिला व नागरिकांनी सापळा रचून येथील वार्ड क्र.१४ च्या चौकात दारू पकडण्यात आली. यात २८० नग देशी दारू ९० मिली किंमत १४ हजार रुपये, ३५ नग १८० मिली देशी दारू किंमत तीन हजार पाचशे रुपये असा एकूण १७ हजार पाचशे रुपयांचा माल व चारचाकी वाहन पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी अमर वेटी रा. वनसडी याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here