पोळा आणि गणेशोत्सवात आवश्यक निर्बंध पाळा : गडचांदूरचे ठाणेदार सत्यजित आमले यांच्या सूचना

By : Shankar Tadas

गडचांदूर :
कोविडचा धोका संपलेला नाही. तिसऱ्या लाटेबाबत आरोग्य विभाग सतर्क करीत आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. येत्या पोळा, गणेशउत्सव आणि इतर सणाच्या वेळी शासनाने घालून दिलेले निर्बंध सर्वांनी पाळावे, अशा सूचना गडचांदूर पोलीस स्टेशनचे नवीन पोलीस निरीक्षक सत्यजित आमले यांनी केल्या. आज 28 ऑगस्ट रोजी त्यांनी पोलीस स्टेशन परिसरात शांतता कमिटीच्या सदस्यांची ओळख करून चर्चा केली.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ने 4 फूट व घरगुती साठी 2 फूट उंचीची मूर्ती स्थापन करावी, मिरवणूक काढण्यास व डीजेला यावर्षी सुद्धा बंदी असून कार्यक्रम स्थळी गर्दी होणार नाहीत याची काळजी मंडळांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज, व्हिडिओ व्हायरल करून शांतता भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या. याप्रसंगी शांतता कमिटी चे सदस्य हंसराज चौधरी, मनोज भोजेकर,लोकदर्शनचे संपादक,शंकर तडस,मोहन भारती, माजी न,प, उपाध्यक्ष सचिन भोयर, नगरसेवक पापय्या पोन्नमवार, विक्रम येरणे,रामसेवक मोरे, रोहन काकडे, रोहित शिंगाडे, महेंद्र ताकसांडे, विठ्ठलराव थिपे तथा शहरातील प्रमुख पत्रकार, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध गणेशोत्सव मंडळ चे पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या आयोजनासाठी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शकील अन्सारी, धर्मराज मुंढे, सुषमा आडकीने तथा इतरांनी सहकार्य केले.
फोटो

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *