गडचांदूर येथील मुक्तीधाम मध्ये सोई सुविधा उपलब्ध करा,, जनसार्थक युवा मंच ची मागणी

लोकदर्शन 👉 मोहन भारती

गडचांदूर : औद्योगिक शहर गडचांदूर येथील मुक्तीधाम येथे बऱ्याच सोई सुविधा नसल्याने नागरिकांना अतोनात त्रास होत आहे. तेव्हा नगर परिषदेने त्वरित सोई सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी जनसार्थक युवा मंच गडचांदूर ने नगराध्यक्ष कडे निवेदनातुन केली आहे. नगर परिषदेने मुक्तीधामच्या विकासासाठी ब्लू प्रिंट तयार करून विकास कामे पूर्ण करण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे,येथे निवारा शेड,सिमेंट काँक्रीटीकरण,परिसरात वृक्षारोपण करने,राख वाहून नेण्यासाठी अंडर ग्राउंड गटार तयार करणे,नळ व्यवस्था करणे,पथदिवे लावणे,बैठक व्यवस्था अद्यावत करणे,सुंदर विसावा ओटा तयार करण्यात यावा,प्रवेशद्वार अद्यावत करणे,नेहमीसाठी चौकीदार व सफाई कामगार ठेवणे,अद्यावत प्रसाधन गृह निर्माण करणे, बगीचा करून सौंदर्यीकरण करावे,आदी मागण्या निवेदनात केल्या आहेत. 10ऑगस्ट ला मुक्तीधाम येथे एका व्यक्ती वर अंत्यसंस्कार सुरू असताना लोखंडी कटगर नातेवाईकांच्या पायावर पडल्यामुळे पायांच्या बोटांना इजा झाली, अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी नगरपरिषदेने सर्व सोयी सुविधा युक्त मुक्तीधाम तातडीने तयार करण्यात यावे,अशी मागणी केली आहे, नगर परिषदेने लक्ष न दिल्यास जनसार्थक युवा मंच च्या वतीने आंदोलन केले जाईल असा इशारा युवा मंच चे मनोज भोजेकर, पवन राजूरकर, रोहन काकडे,रोहित शिंगाडे,आदींनी दिला आहेत.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *