विद्यार्थीनी सातत्यपूर्ण परिश्रमाने जीवनात यशस्वी व्हावे आमदार सुभाष धोटे.

By : Mohan Bharti

इन्फट कान्वेंट येथे इयत्ता १० वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

राजुरा :– नुकत्याच जाहीर झालेल्या इयत्ता १० वी च्या निकालात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इन्फट जिसस इंग्लिश पब्लिक हायस्कूल राजुराच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज आमदार सुभाष धोटे आणि उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यात ९६ % घेऊन इन्फंट कान्व्हेंट मधून प्रथम येणाऱ्या कु. हिमांशी निवलकर आणि कु. तिशा भगत, ९५ % घेऊन द्वितीय येणारी कु. पुनम जेऊरकर आणि ९१ % घेऊन तृतीय येणारी कु स्नेहा झाडे यासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय स्तरावर मिळविलेले यश पुढील महाविद्यालयीन व आवडीच्या व्यावसायिक अभ्यासकात अधिक मजबूत करावे. उत्तम ज्ञान आणि कौशल्य संपादित करून सातत्यपूर्ण परिश्रमाने जीवनात यशस्वी व्हावे. आपले, आपल्या आई, वडील, गुरूजनांचे नाव कमवावे. यासाठी आवश्यक परिश्रम व ज्ञानसाधना अंगी बाळगावी.
या प्रसंगी आमदार तथा इन्फट जिसस सोसायटीचे अध्यक्ष सुभाष धोटे, नगराध्यक्ष तथा संस्थेचे सचिव अरुण धोटे, शाळेचे संचालक अभिजित धोटे, स्टेट शाखेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू, सीबीएसई शाखेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, मुख्याध्यापक रफिक अन्सारी, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन रामकली शुक्ला यांनी तर आभार प्रदर्शन शोएब शेख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *