गडचांदूर येथील जेष्ठ नागरिक सेवा संस्था ला हरिश्चंद्र अरोरा यांच्याकडून 11हजार 500 रुपयांची मदत

दि.१७/०३/२०२१ मोहन भारती 

गडचांदूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहासमोरच्या खुल्या जागेवर जेष्ठ नागरिक सेवा संस्था, गडचांदूर च्या सभागृहाचे भूमिपूजन आमदार सुभाष धोटे,यांच्या हस्ते करण्यात आले. या सभागृहाच्या बांधकाम साठी आमदार सुभाष धोटे यांनी त्यांच्या आमदार स्थानिक विकास निधी 20 लक्ष मंजूर केले आहे.याप्रसंगी आयोजित करण्यात आले ल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नगराध्यक्षा सविताताई टेकाम होत्या.  प्रमुख अतिथी म्हणून राजुरा चे नगराध्यक्ष अरुण धोटे, पोलीस निरीक्षक गोपाल भारती, तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विठ्ठलराव थिपे,गटनेते विक्रम येरणे, नगरसेवक पापय्या पोन्नमवार,सागर ठाकुरवार, हंसराज चौधरी, जेष्ठ नागरिक सेवा संस्था चे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा ,सचिव बाळासाहेब मोहितकर, होते.याप्रसंगी जेष्ठ नागरिक सेवा संस्थेचे अध्यक्ष हरिश्चंद्र अरोरा यांनी संस्थेला 11 हजार रुपयांची आर्थिक मदत केली, त्यांच्या या निर्णयाचे जेष्ठ नागरिक सेवा संस्थेने अभिनंदन करून आभार मानले,तसेच पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांनी पाण्याची बोअरवेल व मोटार दिल्या बद्दल अभिनंदन करून आभार मानले.शहरातील दानशूर व्यक्ती नि सुद्धा संस्थेला मदत करावी असे आवाहन जेष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने करण्यात आले आहेत.

लोकदर्शन

लोकदर्शन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *