रविकुमार बंडीवार नांदाफाटा प्रतिनिधी : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी 27 डिसेंबर पासून नागपूर येथील संविधान चौकात विदर्भवादी नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्यासह अन्य नेते आमरण उपोषणाला बसलेले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती शेतकरी संघटना स्वतंत्र भारत पक्ष तालुका कोरपणाच्या वतीने यवतमाळ जिल्ह्याला जोडणाऱ्या वनोजा पू लावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी तब्बल दोन तास वाहतूक रोखुन धरली. यामुळे ट्रक सह इतरही वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसल्या. आंदोलनात स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी सभापती नीलकंठ कोरांगे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण नवले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील बावणे माजी संचालक भास्कर मते माजी सरपंच सचिन बोंडे हिरापूरचे उपसरपंच अरुण काळे रत्नाकर चटप अनील चटप निलय झुरमुरे संजय मडावी विलास आगलावे,मोहन देरकर,युवा कार्यकर्ते विपिन लोहे,निलेश चिंचोलकर, आदिंसह शेकडो कार्यकर्त उपस्थित होते. आज नागपूरकडे होणार शेकडो कार्यकर्ते रवाना ..स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी ॲड. चटप यांच्या समर्थनार्थ आंदोलन तीव्र करण्याच्या हेतूने आज 1 जाने.रोजी कोरपणा राजूरा गोंडपिपरी जिवती तालुक्यासह विदर्भातील सर्व जिल्ह्यातून शेकडो कार्यकर्ते नागपूर येथे रवाना होणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते सुनील बावणे यांनी यावेळी दिली .
Related Posts
कोरपना येथील अंगणवाडी क्रमांक 6 मध्ये दुर्लक्ष
लोकदर्शन 👉 नितेश केराम चंद्रपूर / कोरपना शहरातील अंगणवाडी क्र सहा या अंगणवाडीची सम्पूर्ण दुरवस्था झाली असून या ठिकाणी अंगणवाडीमध्ये प्लोरिंग नसल्याने या शाळेतील चिमुकले मुले जमिनीवर बसून शाळेत मिळणारे जेंवणाचा आस्वाद घेत असतात तेव्हा…
मोकाट गुरांमुळे शेतकरी त्रस्त
लोकदर्शन 👉नितेश केराम कोरपना शहरात मोकाट जनावरंचा सुळसुळाट झाला असून त्यामुळे शेतकऱ्याच्या हातात आलेला माल फस्त केला जात आहे.यात शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असून जनावरांचे मालक आपले जनावर ताजेतवाने करून घेत आहे आपल्या जनावरला…
महात्मा गांधी विद्यालयात डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी
लोकदर्शन 👉 मोहन भारती ,,,,,,,,,,,,,,,,,,,, गडचांदूर ,,,,,,,,,,,,,,,,,,,,, महात्मा गांधी विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे भारताचे पहिले कृषिमंत्री ,शिवाजी शिक्षण संस्था चे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ पंजाबराव देशमुख यांची जयंती साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी…