जुळ्या नातवंडाच्या स्वागतासाठी उद्योगपती आजोबा करणार 300 किलो सोने दान

By : Shankar Tadas
आपल्या जुळ्या नातवंडाच्या भारतात स्वागतासाठी आपल्या देशातील प्रसिद्ध उद्योगपती आजोबा करणार तब्बल 300 किलो सोने दान करणार असल्याचे वृत्त देशभर झडकले आहे.
दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आजोबा झाले आहेत. त्यांची मुलगी ईशा अंबानी यांनी १९ नोव्हेंबर रोजी जुळ्या मुलांना अमेरिकेत जन्म दिला. उद्योगपती अजय आणि स्वाती पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी ईशाचा विवाह झाला आहे. ईशाने एक मुलगी आणि एका मुलाला जन्म दिला आहे, मुलीचे नाव आदिया तर मुलाचे नाव कृष्णा असे ठेवले आहे. ही नातवंडे आता पहिल्यांदाच भारतात येत आहेत. त्यासाठी, अंबानी आणि पिरामल कुटुंबीयांनी जय्यत तयारी केली असून अंबानींकडून आज ३०० किलो सोने  दान करण्यात येणार आहे. ईशा ही मुकेश आणि नीता अंबानी यांची एकुलती एक मुलगी आहे. वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी तिने वडिलांना रिलायन्सचा व्यवसाय हाताळण्यास मदत करण्यास सुरुवात केली. ईशा आणि आनंद १२ डिसेंबर २०१८ रोजी विवाहबंधनात अडकले होते. लग्नानंतर ते अमेरिकेत होते. आता विमानातून भारतात येताना अमेरिका आणि भारतातील स्पेशालिस्ट डॉक्टरांची टीमही त्यांच्यासोबत येत आहे.

*****

संदर्भ : लोकप्रिय दैनिक लोकमत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here