नौकारी येथील नाल्याच्या पाण्यात वाहून गेलेल्या संजय चा शोध अखेर लागला


लोकदर्शन👉 मोहन भारती
,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
गडचांदूर
अमलनाला धरणाजवळ असलेल्या नौकारी येथील संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष हा व्यक्ती दिनांक 10।7।2022 रोजी सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंस) ता.राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला व नाल्याच्या दोन्ही बाजुने अमलनाला धरणा पर्यंत व धरणात शोध घेतला असता कुठेच आढळून आला नव्हता व शोध घेण्यासाठी दि.11/07/2022 ला नोकारी बु. व अमलणाला धरण येथे चंद्रपूर येथील पोलीस विभागाचे शोध पथक दाखल झाले व शोध घेतला असता त्याना सुध्दा या शोधकार्यात यश आले नाहि व पावसाचे व पुराचे वाढते प्रमाण पाहता शोध घेण्यात अडथळा निर्माण होत होता,
तब्बल चौथ्या दिवशी बुधवारी दुपारी 12 च्या दरम्यान शंकरदेव मंदिरासमोर अमलनाला धरणाच्या पाण्यात संजय चा मृतदेह पाण्यावर तरंगताना मच्छिमार करणाऱ्या व्यक्ती ला दिसला ,याची माहिती पोलिसांना व नातेवाईकांना देण्यात आली, पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पोस्टमार्टेम केल्यानंतर तिथेच सायंकाळी 5 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले, याप्रसंगी परिवारातील नातेवाईक, ग्रामस्थ, उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here