राधा पडवे यांचावर हल्ला करणाऱ्या आरोपीला कठोर कार्यवाही करण्यासाठी संघटनेकडून अपर पोलिस आयुक्त (गुन्हे)यांना निवेदन


लोकदर्शन 👉 मोहन भारती

नागपूर ÷*धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर, महाराष्ट्र राज्य कडून श्री नविनचंद्र रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पोलीस भवन नागपूर यांना निवेदन देण्यात आले आहे. पोलीस कर्मचारी राधा पडवे वर झालेल्या जीवघेणी हल्याबाबत साहेबांशी सविस्तर चर्चा करण्यात आली, साहेबानी लगेच फोन करून श्रीमती राधा पडवे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन संपूर्ण चौकशी करण्यात यावी त्याची माहिती लगेच कळवावी असे आदेश गिट्टीखदान पोलीस स्टेशन ला देण्यात आले, त्यावर गिट्टीखदान चे वरिष्ठ अधिकारी विम्स हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेऊन पेशंट विषयी संपुर्ण माहिती घेण्यात आली, तसेच आरोपीला लाल बिल्डींग नंबर 5 येथील क्वार्टर 142 खाली करायचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे. आणि आरोपी संदिप पॊनिकर यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल आणि त्याला बडतर्फ करण्यात येईल असा लवकरच निर्णय घेण्यात येणार अशी माहिती दिली. श्रीमती राधा पडवे याना पोलीस संरक्षण देण्यात यावे, तसेच आरोपीवर तात्काळ गंभीर कारवाई करून, आरोपीला सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी धनगर अधिकारी कर्मचारी संघटना नागपूर,महाराष्ट्र राज्य कडून करण्यात आली आहे.*
*निवेदन देताना धनगर अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य चे सचिव श्री शरद उरकुडे, नागपूर जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत कातरे , डॉ प्रवीण पडवे साहेब उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here