अंबुजा सिमेंट फाउंडेशनची कृषी दिनानिमित्य जनजागृती रॅली

लोकदर्शन👉
कोरपना : तालुक्यातील आसन खुर्द येथे कृषी दिनाचे औचित्य साधून अंबुजा सिमेंट फाउंडेशन, उत्तम कापूस उपक्रम आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आसन खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जैविक शेतीबद्दल माहिती देण्यात आली. फवारणी करताना सुरक्षा साधनाचा वापर करावा हा संदेश प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून देण्यात आला. आंतरपीक, खत व्यवस्थापन, एकात्मिक किड व्यवस्थान, बोंड अळी याबद्दल तसेच नुकतीच शाळा सुरु झाली असल्यामुडे एकही मूल घरी न राहता प्रत्येक मूल शाळेत जाईल हा संदेश रॅलीच्या माध्यमातून गावामधें पोहचविण्यात आला. रॅलीत सरपंचा सौ.निर्मला मरसकोल्हे, कृषी सहायक तिडके.मुख्याध्यापक सोयाम, शिक्षक धंदरे, शाळा सुधार समितीचे अध्यक्ष गणेश मुरकुटे, अंबुजा फ़ाउंडेशनचे प्रक्षेत्र अधिकारी किशोर शेंडे, अनिल पेंन्दोर, आशिष रागीट, अशा वर्कर अश्विनी नांदेकर, अंगणवाडी सेविका सौ. मंगला बावणे, ग्रा.प. सदस्य भास्कर मत्ते, सागर मत्ते, रंजू किन्नाके, शोभा कुमरे, प्रभाकर सोनटक्के, सोनेराव कुमरे व आदी शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here