थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती भाजपा राजुरा तर्फे साजरी* *माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी माल्यार्पण करून केले अभिवादन*

लोकदर्शन 👉 शिवाय सेलोकर


थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राजुरा येथील माळी वार्ड येथे राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले व तसेच माळी वार्डातील जेष्ठ नागरिक श्री.उद्धवजी शेंडे व श्री.हिरामण श्रीकोंडावार यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला,यावेळी माजी आमदार अँड.संजय धोटे यांनी यावेळी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले,

याप्रसंगी उपस्थित राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अँड.संजय धोटे यांच्या सह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विनायक देशमुख,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सतीश धोटे,भाजपा तालुका महामंत्री दिलीप वांढरे,भाजप महामंत्री प्रशांत घरोटे,माजी नगरसेवक राधेश्याम अडाणीया,माजी नगरसेविका श्रीमती उज्वला जयपूरकर, भाजपा नेते सुरेश रागीट,भाजयुमो तालुका महामंत्री रवि बुरडकर,भाजपा नेते जनार्धन निकोडे,छावा संघटनेचे आशिष करमरकर,अनिल खनके,राजू उपलंचिवार,कैलास कार्लेकर,संजय समर्थ,शंकर गुरनुले,पांडुरंग साळवे,नामदेव शेंडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here