डॉ दीपक कुमार खोब्रागडे साहेब. संस्थापक अध्यक्ष, जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर आभार ÷विलास खरात

लोकदर्शन 👉 राहुल खरात

आटपाडी
आपले दिनांक २० मार्च २०२२ चे पत्र मिळाले.आपण व आपल्या सहकाऱ्यांनी जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त २७ तारखेस नागपूर येथे दीक्षा भूमी,आँडिटोरियम सभागृहात मजला ” जीवन गौरव पुरस्काराने” सन्मानित करण्यात येणार असल्याचे पत्र मिळाले.मजला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यामुळे प्रेरणा व स्फूर्ती देणारी बाब आहे त्यामुळे मजला व सांगली जिल्ह्यातील जनतेला अत्यानंद झाला आहे . थोर साहित्यिक डॉ शंकरराव खरात यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला आहे त्याबद्दल महाराष्ट्र तील साहित्यिक, विचारवंत व आम्हा सर्वांना आनंद झाला आहे.हा पुरस्कार जाहीर केल्या बद्दल महामंडळाचे अध्यक्ष मा. दीपक कुमार खोब्रागडे, कार्याध्यक्ष डॉ गोविंद राव कांबळे, कार्यवाह डॉ रविंद्र तिरपुडे, सरचिटणीस सुजित मुरमाडे व निवड समितीचे सर्व सदस्य, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार मानतो आहे.‍‌. जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळाच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त मी,माझे कुटुंबीयाकडून तसेच साहित्य हरत्न डॉ शंकरराव खरात प्रतिष्ठान,, आटपाडी जिल्हा सांगली, सिध्दार्थ गृहनिर्माण संस्था, आटपाडी,व सांगली जिल्ह्यातील जनतेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here