वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून माहिती अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ.

लोकदर्शन 👉 मोहन भारती

⭕अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची देवाळकर यांची वरिष्ठांकडे मागणी.

राजुरा :– राजुरा तालुक्यातील मौजा चनाखाचे उपसरपंच विकास देवाळकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी राजुरा यांच्याकडे राजुरा वनपरिक्षेत्रातील चनाखा क्षेत्रातील खिरणी प्लांटेशन मध्ये सन २०१८ – २०१९ मधील २५ हेक्टर जमिनीवर वृक्षलागवड करण्यात आल्याचे दर्शविले आहे. या संदर्भात कम्पारमेंट नंबर १७२ मधील खिरणी या रोपवाटिकेची माहिती मागितली होती. मात्र संबंधित माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी देण्यास नकार दिला.
त्यांनतर देवाळकर यांनी उपविभागीय वनअधिकारी राजुरा यांच्याकडे १२ आँगस्ट २०२१ ला अपिल केली. त्यावर उपविभागीय वनअधिकारी यांनी वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांना ७ दिवसात माहिती देण्याचे आदेश दिले. मात्र त्यानंतरही त्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे शेवटी वैतागून देवाळकर यांनी दिनांक ४ आॅक्टोबर २०२१ रोजी राज्य माहिती आयुक्तांकडे अपील केली. त्याची पोचपावती सुध्दा मिळाली मात्र अजूनही वनपरीक्षेत्र अधिकाऱ्यांनी माहिती दिली नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करून माहिती उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुन्हा राज्य माहिती आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे वनमंत्री, उपवन अधिकारी चंद्रपूर यांना सुध्दा दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here