वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्य व अंधांना काठीचे वाटप ● उपसरपंच वामन तुरानकर यांचा उपक्रम

लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर

राजुरा, दि. २३ फेब्रुवारी : तालुक्यातील नोकारीचे उपसरपंच तथा भाजपाचे नेते वामन तुराणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवून नागरिकांना उपयोगी साहित्याचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
नोकारी व परिसरातील अंध बांधवांना ब्लाइंड वाकिंग स्टिक, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. कोविड-१९ च्या प्रादुर्भावात जीव गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांना जीवनावश्यक साहित्य व कपडे देण्यात आले. तुरानकर यांचा वाढदिवस हा दरवर्षी लोकाभिमुख उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो असतो. या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here